

Stock Market Today : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि HDFC बँकेच्या मजबूत कमाईच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराने आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी तेजीत सुरुवात केली आहे. सोमवारी (दि.१६) सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३०० अंकांनी वाढला तर निफ्टीने १८ हजारांवर व्यवहार केला. सकाळच्या व्यवहारात येस बँक, एल अँड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेड, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, टाटा स्टील, व्होडाफोन आयडिया, आयडीएफसी बँक, फेडरल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक यांचे शेअर्स वधारले होते.
डॉलरच्या तुलनेत जपानचे अधिकृत चलन येन मजबूत झाल्यामुळे टोकियोचे शेअर्स सोमवारी खाली आले होते. निक्केई २२५ निर्देशांक १.१४ टक्के म्हणजेच २९७ अंकांनी घसरून २५,८२१ वर, तर टॉपिक्स निर्देशांक ११ अंकांनी घसरून १,८९१ वर आला. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढीची गती कमी करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या सकारात्मक भावना उंचावल्या आहेत.
हे ही वाचा :