

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक भांडवली बाजारांमधून मिळणार्या सकारात्मक संकेतांमुळे आज ( दि. ११ डिसेंबर) आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज शेअर बाजारात किंचित वाढ होऊन व्यवहाराला सुरुवात झाली. सेन्सेक्स आज 69,925.63 च्या पातळीवर उघडला; पण काही काळानंतर तो 70,000 चा आकडा पार केला. यासह सेन्सेक्सने नवा विक्रम केला आहे. सेन्सेक्सने पहिल्यांदाच 70000 चा टप्पा पार केला आहे. सेन्सेक्सचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. stनिफ्टी 21000 च्या समीप व्यवहार करत आहे. बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला पाठिंबा मिळत आहे. यापूर्वी शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 303 अंक वधारत 69,825 वर बंद झाला होता.
गेल्या आठवड्यात बी ३० शेअर्सचा सेन्सेक्स २,३४४.४१ अंकांनी किंवा ३.४७ टक्क्यांनी वाढला. तर आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी, 30 शेअर्सवर आधारित सेन्सेक्स 303.91 अंकांनी किंवा 0.44 टक्क्यांनी वाढून 69,825.60 अंकांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता. तर NSE निफ्टी 50 ने 0.24% वाढून 21,019.80 चा ताज्या उच्चांक गाठला हाोेता.
सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात कोल इंडिया, ओएनजीसी, इंडसइंड बँक, यूपीएल आणि अल्ट्राटेक सिमेंट NSE निफ्टी 50 वर नफ्यात आघाडीवर राहिले. तर सेन्सेक्सने 223.30 अंकांची उसळी घेत सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात 70,048.90 च्या विक्रमी उच्चांक गाठला आहे.
आज शेअर बाजारातील प्रारंभीच्या व्यवहारात बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला पाठिंबा मिळाला. तर फार्मा आणि ऑटो शेअर्समध्ये विक्रीमुळे वरच्या पातळीवर दबाव राहिला.
स्वस्त कच्चे तेल म्हणजे आर्थिक ताण कमी करणारा ठरतो. कच्च्या तेलाचा आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांचा इनपुट म्हणून वापर करणाऱ्या कंपन्यांवरही त्याचा परिणाम दिसतो. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या घसरणीमुळे बाजारात उत्साह आहे.
हेही वाचा :