इस्त्रायल-हमास संघर्ष- बाजारावर परिणाम, कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी?

इस्त्रायल-हमास संघर्ष- बाजारावर परिणाम, कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी?
Published on
Updated on

इस्रायल-हमास युद्ध संपुष्टात येण्याची शक्यता मावळत चालली आहे. इतकेच नव्हे, तर गाझामधील हॉस्पिटलवरील हल्ल्यापुढे इतर मुस्लीम राष्ट्रे त्यामध्ये भाग घेतील काय, अशी शंका बळावल्यामुळे कू्रड ऑईलचे दर 90 रुपये ओलांडून गेले. त्यामुळे आधीच फेड व्याज दर वाढण्याच्या आशंकेने जागतिक बाजार झाकोळून गेले असता जागतिक संकेत अधिकच कमजोर बनले. मंगळवारचा दिवस वगळता संपूर्ण आठवडा बाजार नरमाईतच होता. निफ्टी 50 सव्वा टक्के, सेन्सेक्स दीड टक्के आणि निफ्टी बँक दोन टक्के घसरले.

निफ्टी 50 ………………………. 19542.65
सेन्सेक्स ………………………… 65397.62
निफ्टी बँक ……………………… 43723.05

या आठवड्याचे वैशिष्ट्य म्हणजे निफ्टी ऑटो वगळता झाडून सारे Broader आणि Sectoral निर्देशांक लाल रंगात न्हाऊन निघाले. हिरो मोटो (रु. 3211.25), टाटा मोटर्स (रु. 663.20), मारुती (रु. 10725.65), बजाज ऑटो (रु. 5489.30) या शेअर्सनी 4 टक्के ते साडेसात टक्के तेजी दाखवली. दुसर्‍या तिमाहीतील सशक्त आर्थिक निकांलामुळे बजाज ऑटो साडेसात टक्के वाढला. निव्वळ नफ्यात वाढ, उत्पन्नात वाढ, देशांतर्गत भरघोस मागणी आणि निर्यातीत हळूहळू सुधारणा या गोष्टी बजाज ऑटोच्या तेजीला कारणीभूत ठरल्या. दसरा-दिवाळीच्या तोंडावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मागणी वाढल्याचा हा परिणाम!

एक दिलासादायक बाब म्हणजे FIIS नी सलग विक्री थांबवली आणि भारतीय बाजारात खरेदीला सुरुवात केली. DIIS चा खरेदीचा ओघ अव्याहत सुरू राहिला. Fact, ITI, Suzlon, GSFC, BBTC, Ircon हे शेअर्स तुफ ान तेजीत राहिले. Fact ची धुवांधार फलंदाजी गुंतवणूकदारांना मालामाल करून सोडत आहे.

एका वर्षात हा शेअर 500 टक्क्यांहून अधिक म्हणजे पाच पटींपेक्षा अधिक वाढला आहे. Fertilizers and Chemicals Travancore Ltd. हा Fact चा Full Form आहे आणि खते आणि केमिकल्स सेक्टरमधील ही कंपनी भारत सरकारच्या अधिपत्याखाली काम करते.

कित्येक वर्षे Penny Stock या शिक्का बसलेला सुझलॉनचा शेअर दमदारपणे वाटचाल करू लागला आहे. या आठवड्यातही तो 20 टक्के वाढला. (रु. 32.50) IGL, Hudco, Emphasis, Biocan, Syngtne हे शेअर घसरले. 79 रुपये दराने हुडकोच्या शेअरमध्ये शासनाने offer for sale योजना आणल्यामुळे हुडकोच्या शेअरमध्ये घसरण झाली.

अनंतराज लि. आणि सनटेक रिअ‍ॅल्टी या रिअ‍ॅल्ट सेक्टरमधल्या शेअर्सनी वर्षभरातील उच्चांक नोंदवले. यापैकी अनंतराज लि. ही कमर्शिअल प्रोजेक्टस् करणारी मोठी कंपनी आहे. मागील तीन वर्षांत तिच्या विक्री आणि नफ्यामध्ये चांगलीच वाढ झाली आहे. शेअर्समध्ये परदेशी गुंतवकणूक संस्थांचा जवळपास 10 टक्के वाटा आहे. हा शेअर मागील एका वर्षात 125 टक्के वाढला आहे. आता कंपनीला दोन भव्य प्रकल्प सुरू कतर आहे. विक्रीमध्ये सात लाख चौरस फुटांचा कमर्शिअल प्रोजेक्ट आणि तिरुपती (आंध्र प्रदेश) येथे 10 लाख चौरस फुटांचा गृहनिर्माण प्रकल्प यांचा समावेश आहे. शुक्रवारचा शेअरचा बंदभाव 237 रुपये आहे. अवश्य गुंतवणूक करावी असा हा शेअर आहे.

रिअल इस्टेट, इपीसी आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट क्षेत्रात काम करणारी एक दर्जेदार कंपनी म्हणून NBCC (India) Ltd. या कंपनीचा नावलौकिक आहे. भारत सरकारच्या मालकीची ही नवरत्न कंपनी आहे. विशाखापट्टनम पोेर्टकडून कंपनीला मोठे कंत्राट मिळाले आहे. हाही शेअर 52 Week High ला आहे. गेल्या एका वर्षात हा दुप्पटीपेक्षा अधिक वाढला आहे. सध्याचा भाव 68.49 रुपये आहे.

mcx, Zomato या शेअर्सनी वर्षभरातील उच्चांकी भाव दाखवले आहेत. IRCTC च्या ऑनलाईन कॅटरिंग पोटर्र्लवरून येणार्‍या ऑर्डर्स डीलिव्हर करण्यासाठी झोमॅटोचा आयआरसीटीशी करार झाला आहे. झोमॅटोच्या व्यवसायवृद्धीसाठी ही अतिशय महत्त्वाची घटना आहे. बजाज इलेक्ट्रीकलशी पॉवर ग्रीडने रु. 347.29 कोटी रुपयांचा सेवा करार केला आहे. पीव्हीआर ऑइनॉक्स ही कंपनी मागील वर्षी रु. 81.6 कोटी तोटा दर्शवत होती. तिने यावर्षी 166.3 कोटी रुपये नफा दर्शवला आहे. 1691 रुपये हा आजचा शेअरचा भाव आहे. नजीकच्या काळात तो 2000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. नेस्ले (आजचा भाव रु. 24282) तिच्या शेअर्सने 1ः10 या प्रमाणात प्रथमच विभाजन करत आहे. अत्यंत उच्च दर्जाचे आणि कमालीचे सुरक्षित असे काही शेअर्स असतात. बहुतांश करून ते पाच वर्षांच्या कालावधीत आपले भांडवल दुप्पट करून देतात. नेस्ले हा एक शेअर आहे. गेल्या पाच वर्षांत त्याने दीडशे टक्के परतावा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news