Steam Machine : गॅस नाही, तरीही रोज तयार होते 25 हजार लोकांचे जेवण

Steam Machine
Steam Machine
Published on
Updated on

जयपूर : राजस्थानमध्ये असे एक स्वयंपाकघर आहे जिथे गॅसच (Steam Machine) उपलब्ध नाही. तरीदेखील तिथे एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील भव्य स्वयंपाकघरात रोज अवघ्या दोन तासांत 25 ते 35 हजार लोकांचे जेवण तयार केले जाते. आहे की नाही कमाल. केवळ 1 तासात 50 हजार चवदार रोट्या आणि गरमागरम पराठे तिथले बल्लवाचार्य तयार करतात. त्यामुळे या स्वयंपाकघराची देशभर चर्चा होताना दिसते.

लांब आणि रुंद कॉरिडॉरमध्ये डाळ-भातदेखील बनवला जातो. वाफाळणारा चहा आणि कॉफीसुद्धा इथे तुम्हाला सहज मिळते. खास गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्न शिजवले जाते व तेही गॅसशिवाय. होय… तिथे स्वयंपाकासाठी अग्नीचा वापर केला जात नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असे की, राजस्थानात हे विशालकाय स्वयंपाकघर (Steam Machine) नेमके कुठे आहे. ते आहे राजस्थानमधील अबू रोड येथील शांती वन कॉम्प्लेक्समध्ये.

हे स्वयंपाकघर म्हणजेच 'शिव बाबांचा भंडारा'. विशेष म्हणजे, 50 हजारांहून अधिक महिला याठिकाणी समर्पितपणे सेवा देत आहेत. या ठिकाणी 15 लाख नियमित आध्यात्मिक सेवा घेतलेले विद्यार्थी आहेत. ते नियमितपणे राजयोगाचा अभ्यास करतात आणि संस्थेच्या सेवा केंद्रांना भेट देऊन सत्संग करतात. या ठिकाणी स्टीम मशिनमध्ये (Steam Machine) (वाफयंत्रे) सर्व अन्नपदार्थ तयार केले जाते. वरच्या बाजूच्या चेंबरमध्ये भात आणि डाळ बनवली जाते. भाजीपाला धुणे, कापणे आणि तयार करणे यासाठी स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात आली आहे.

या ठिकाणी 6 हजार लोकांचे जेवण (Steam Machine) अवघ्या 45 मिनिटांत सहज तयार होते. या स्टीम मशिन्समध्ये एका दिवसात 3 टन वाफ तयार होते आणि या वाफेचा वापर जेवण बनवण्यासाठी केला जातो. तेथे 4 बॉयलर बसवले असून ते दर तासाला 600 ते 800 किलो लिटर वाफ तयार करतात. जसे आजसुद्धा काही ठिकाणी वाफेच्या शक्तीवर रेल्वेचे इंजिन धावताना दिसते. तसेच येथे बाष्पशक्तीवर गरमागरम अन्न शिजवले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news