shashikant ghorpade
shashikant ghorpade

मोठी बातमी : राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता, नीरा नदीमध्ये उडी मारल्याचा संशय

Published on

नसरापूर: पुढारी वृत्तसेवा :  राज्याचे पणन सहसंचालक संचालक शशिकांत पतंगराव घोरपडे हे बेपत्ता झाले असून त्यांनी सारोळा(ता.भोर) येथे निरा नदीमध्ये उडी मारल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. निरा नदीपात्रामध्ये युद्धपातळीवर शोध कार्य सुरू असून घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत.

घोरपडे यांचे शेवटचे लोकेशन शिरवळ येथे दिसून आले. याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी पहाटे हरवल्याची तक्रार नातेवाईकांनी देण्यात आली आहे. शिरवळ येथील नीरानदीच्या पात्रालगत एका हॉटेलपासून एक व्यक्ती चालत पूलाकडे जात असल्याचे दिसून आले. यामुळे नेमके कोणत्या व्यक्तीने नदीपात्रात उडी मारली आहे. याबाबत स्पष्टता होत नाही. घटनास्थळी मिसिंग अधिकाऱ्याचे नातेवाईक यासह राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील पोलीस नाईक गणेश लडकत, शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल बारेला दाखल झाले आहेत. महाबळेश्वर टेकर्स, शिरवळ शिरवळ रेस्क्यू टीम, भोर आपत्ती व्यवस्थापनचे, भोईराज जलआपत्ती असे एकूण 45 अधिक शोध घेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news