

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक (महाराष्ट्र राज्य मुंबई) जाहीर झाले असून ऑनलाईन अर्ज करणे, निश्चिती करणे व परीक्षेचे संभाव्य दिनांक जाणून घ्या.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षांकरीता उमेदवारांसाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज सुरु झालेल्या व सुरु होणाऱ्या वेळापत्रकाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
१) सामाईक प्रवेश परीक्षेचे नाव – महा-बीएड एमएड (३ वर्ष एकात्मिक) सीईटी २०२४
संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे – प्रारंभ दिनांक – १०-०१-२०२४, अंतिम दिनांक – २९-०१-२०२४
सामाईक परीक्षेचा संभाव्य दिनांक- ०२-०३-२०२४
२) सामाईक प्रवेश परीक्षेचे नाव – महा-एमएड सीईटी २०२४
संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे – प्रारंभ दिनांक – १०-०१-२०२४, अंतिम दिनांक – २९-०१-२०२४
सामाईक परीक्षेचा संभाव्य दिनांक- ०२-०३-२०२४
सदर परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.mahacet.org उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, याची सर्व संबंधित विद्यार्थी/पालक यांनी कृपया नोंद घ्यावी.
१ . विद्यार्थ्यांना एकदा नोंदणी केल्यानंतर त्या नोंदणीचा वापर पुढे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठीही नोंदणी करताना होणार आहे.
२. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सामाईक प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या अनाथ व तृतीयपंथीय विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क राखीव प्रवर्गासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काप्रमाणे आकारण्यात येत आहे.
३. सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उमेदवारांसाठी मदत केंद्राव्यतिरिक्त टोकन स्वरूपात तक्रार नोंदविण्यासाठी प्रणाली तसेच प्रगती या चॅटबॉटची मार्गदर्शनासाठी सोय
४. या प्रणाली अंतर्गत करण्यात येणारी नोंदणी अन्य कोणत्याही अभ्यासक्रमांच्या नोंदणीलाही उपयोगी होणार
५. लॉगिन आयडीचा वापर करून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करता येईल. तसेच विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी तयार केलेल्या या लॉगिन आयडीवरून भविष्यात प्रवेश नियामक प्राधिकरण मान्यते प्रक्रियेकरीता तसेच शिष्यवृती लाभासाठी उपयोगात आणता येणार. – आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई
अर्ज नोंदणी, परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक
अ. क्र. सामाईक प्रवेश संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज
परीक्षेचे नाव नोंदणी आणि निश्चिती करणे
प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक परीक्षा संभाव्य दि.