SRH vs KKR : कोलकाताचे हैदराबादसमोर १७६ धावांचे आव्हान

SRH vs KKR : कोलकाताचे हैदराबादसमोर १७६ धावांचे आव्हान
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : SRH vs KKR ipl 2022 : आयपीएलच्या 25 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 176 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. केकेआरने 20 षटकांत 8 गडी गमावून 175 धावा केल्या. नितीश राणाने सर्वाधिक 54, तर आंद्रे रसेलने 24 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या. सनरायझर्सने टी नटराजनने 3 बळी घेतले.

उमरानच्या गोलंदाजीवर श्रेयस बाद

कोलकाता नाईट रायडर्सने चौथी मोठी विकेट श्रेयस अय्यरच्या रुपात गमावली. श्रेयसला त्याच्या दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर उमरान मलिकने बोल्ड केले. श्रेयसने 25 चेंडूत 28 धावा केल्या.

नटराजनला दुहेरी यश, नरेनही बाद

टी नटराजनने आपल्या पहिल्याच षटकात कोलकाताला दोन मोठे धक्के दिले. त्याने प्रथम व्यंकटेश अय्यर आणि त्यानंतर सुनील नरेनला बाद केले. नरेन दोन चेंडूत सहा धावा करून बाद झाला.

नटराजनच्या पहिल्याच चेंडूवर व्यंकटेश अय्यर बाद

नटराजनने पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर व्यंकटेश अय्यरला क्लीन बोल्ड केले. व्यंकटेशने 13 चेंडूत सहा धावा केल्या.

ॲरॉन फिंच स्वस्तात बाद

कोलकाताला पहिला धक्का आरोन फिंचच्या रूपाने बसला आहे. केकेआरकडून पदार्पण करताना फिंच पाच चेंडूत सात धावा काढून बाद झाला. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पूरनच्या हाती मार्को यानसेनने तो झेलबाद झाला.

दरम्यान, सनरायझर्स संघाला नाईलाज म्हणून बदल करावा लागला आहे. दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरच्या जागी जगदीश सुचितचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सने तीन बदल केले आहेत. सॅम बिलिंग्ज, अजिंक्य रहाणे आणि रसिक सलाम यांच्या जागी शेल्डन जॅक्सन, अॅरॉन फिंच आणि अमन खान यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

KKR चा संघ :

आरोन फिंच, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन (विकेटकीपर), पॅट कमिन्स, सुनील नरेन, उमेश यादव, अमन हकीम खान, वरुण चक्रवर्ती.

SRH चा संघ :

अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (विकेटकीपर), एडन मार्कराम, शशांक सिंग, जगदीश सुचित, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅन्सन, उमरान मलिक, टी नटराजन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news