युरो कप : इंग्लंड – इटली भिडणार

युरो कप
युरो कप

लंडन : फुटबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेला इंग्लंड आणि चौथ्यांदा फायनल खेळणारा इटली या दोन संघांमध्ये युरो चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.

इंग्लंडने डेन्मार्कला तर इटलीने स्पेनला हरवून स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

लंडनच्या वेम्बले स्टेडियमवर रविवारी रात्री ही फायनल होणार असून घरच्या मैदानावर रविवारी अंतिम सामना होणार असल्याने इंग्लंडला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळेल.

५५ वर्षांनंतर इंग्लंडला संधी

इंग्लंडने फुटबॉलचा विश्वचषक 1966 ला जिंकला होता. आता युरो चषकाच्या रूपाने 55 वर्षांनंतर पुन्हा एकदा जल्लोष करण्याची संधी असेल. मात्र त्यासाठी त्यांना मागील 33 सामन्यांत अपराजित असलेल्या इटलीचे कडवे आव्हान मोडून काढावे लागणार आहे.

मागच्या 55 वर्षांत इंग्लंडने विश्वचषक आणि युरो अशा 26 स्पर्धा पाहिल्या. सातवेळा तर हा संघ पात्र देखील ठरला नव्हता.

डेन्मार्क आणि ग्रीससारख्या लहान देशांनी जेतेपदावर नाव कोरले, मात्र इंग्लंडचे नशीब फळफळले नव्हते. यंदा मात्र मोठी संधी हातातोंडाशी आली आहे.

वर्ल्डकपची कसर भरून काढण्याची इटलीला संधी

रशियामध्ये 2018 साली झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी इटलीचा संघ पात्र ठरला नव्हता. त्यानंतर दोन वर्षात इटलीने सर्व कसर भरून काढताना यंदाच्या युरो चषक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली.

पेनल्टी शूटआऊटमध्ये गेलेल्या सेमीफायनलमध्ये इटलीने तगड्या स्पेनला 4-2 असा धक्का दिला. यासह इटलीने गेल्या सलग 33 सामन्यांमध्ये अपराजित राहण्याची कामगिरीही केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news