BCCI Elections Schedule : बीसीसीआयचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

BCCI Elections Schedule : बीसीसीआयचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
Published on
Updated on

मुंबई, वृत्तसंस्था : बीसीसीआयने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवडणुकीची (BCCI Elections Schedule) तारीख जाहीर केली आहे. निवडणुकीसोबतच वार्षिक सर्वसाधारण सभेचेही आयोजन करण्यात येणार आहे. बीसीसीआय 18 ऑक्टोबरला निवडणूक घेणार आहे. ही अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह सर्व पदांसाठी असेल. सौरव गांगुली सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. तर जय शहा हे सचिवपदावर आहेत. या दोघांचाही कार्यकाळ पूर्ण होत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्याने आता गांगुली आणि शहा आणखी एका कार्यकाळासाठी निवडणूक लढवू शकतात.

सर्वोच्च न्यायालयाकडून कुलिंगऑफ पिरियड या नियमात सूट देण्यात आल्यानंतर आता बीसीसीआयच्या निवडणूक प्रकियेला वेग आला आहे. येत्या 18 ऑक्टोबरला बीसीसीआयची निवडणूक होणार आहे; पण त्याआधीच्या सर्व प्रकियांना सुरुवात झाली आहे. बीसीसीआयकडून निवडणूक (BCCI Elections Schedule) अधिकारी म्हणून ए. के. ज्योती यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक संलग्न संघटनांना आपल्या प्रतिनिधीचे नाव देण्यास 4 ऑक्टोबरपर्यंतचा अवधी दिला आहे.

बीसीसीआयच्या निवडणुकीसंदर्भात (BCCI Elections Schedule) ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या बातमीनुसार, मुंबईत 18 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. यासाठी मंडळाने 24 सप्टेंबरपासून अर्ज मागवले आहेत. 4 ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. नामनिर्देशन अर्जांची छाननी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. वैध नामांकनांची यादी 13 तारखेलाच प्रसिद्ध केली जाईल. यानंतर 18 ऑक्टोबरला निवडणूक होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे.

विशेष म्हणजे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांचा कार्यकाळ संपणार आहे. मात्र हे दोघेही पुन्हा एकदा नव्या कार्यकाळासाठी निवडणूक लढवू शकतात. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नवा निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर नियम बदलले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news