पॅलेस्टाईनला पाठिंब्यामुळे रोनाल्डोला बेंचवर बसविले; तुर्कस्तानच्या अध्यक्षांचा सनसनाटी दावा

पॅलेस्टाईनला पाठिंब्यामुळे रोनाल्डोला बेंचवर बसविले; तुर्कस्तानच्या अध्यक्षांचा सनसनाटी दावा

अंकारा : कतारमध्ये नुकत्याच झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत काही सामन्यांमध्ये पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला बेंचवर बसवण्यात आले होते. अनेकांना हा निर्णय अनाकलनीय वाटला. आता तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यर एर्दोगान यांनी स्टार फुटबॉलपटूला बाहेर बसवण्यामागचे कारण सांगितले आहे. त्यांनी दावा केला आहे की, पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला म्हणून रोनाल्डो याला बेंचवर बसायला लागले होते.

एर्दोगान यांचा हवाला देत अनेक माध्यमांनी लिहिले की, विश्वचषक स्पर्धेत रोनाल्डोचा योग्य वापर करण्यात आला नाही. उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोकडून पराभूत झाल्याने त्यांचा संघ बाहेर पडला. त्या सामन्यात रोनाल्डोचा बदली खेळाडू म्हणून वापर करण्यात आला होता. अलीकडेच, स्पॅनिशमध्ये 'टुगेदर विथ द पॅलेस्टिनी' असे लिहिलेले चिन्ह असलेला रोनाल्डोचा मोठ्या प्रमाणावर शेअर केलेला फोटो व्हायरल झाला. मात्र, तो काटछाट करून बनवण्यात आल्याचे नंतर स्पष्ट झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news