दिग्गज फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती चिंताजनक

दिग्गज फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती चिंताजनक
Published on
Updated on

साओ पाउलो; वृत्तसंस्था :  फुटबॉलमधील सर्वकालीन महान पेले यांची प्रकृती चिंताजनक आहे. ब्राझीलचा महान फुटबॉलपटू पेले हे सध्या साओ पाउलोच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. त्यांना विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली आहे.

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, 82 वर्षीय माजी फुटबॉलपटू पेले यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. पेले यांचा मुलगा एडसन चोल्बी नॅसिमेंटो शनिवारी रुग्णालयात दाखल झाला, अशी माहिती एपी वृत्तसंस्थेने दिली. पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटोही रुग्णालयात आहे. पेलेच्या मुलाने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट पोस्ट केली, ज्यामध्ये त्याने, पापा… माझी ताकद तुम्ही आहात, असे लिहिले आहे.

कर्करोगाशी झुंज देत असलेले ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही. त्यांना साओ पाउलो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेले यांनी नाताळ सण देखील रुग्णालयातच साजरा केला. त्यांची प्रकृती पाहता नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेण्यास सुरुवात केली आहे. पेले यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली असून, त्यांच्या किडनी आणि हृदयावर परिणाम होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news