टेनिसमध्ये सुवर्णाची ‘आकांक्षा’पूर्ती

टेनिसमध्ये सुवर्णाची ‘आकांक्षा’पूर्ती
Published on
Updated on

पंचकुला ; वृत्तसंस्था : चौथ्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि हरियाणात मोठी चुरस आहे. प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण बनला आहे. एकेका सुवर्णपदकासाठी काट्याची लढाई सुरू आहे. लॉन टेनिसमध्ये सकाळीच महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकरने (पुणे) कांस्य पदक पटकावले. कडाक्याच्या उन्हात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या आकांक्षा निठुरेने कर्नाटकच्या सुहिथा मयुरीचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. हा अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. आकांक्षाने तीन सेटमध्ये (6-7, 7-6 व 6-4) हा सामना जिंकला.
पंचकुलातील जिमखाना मैदानावर ही चुरशीची लढत झाली. पहिल्या सेटमध्ये कर्नाटकच्या मयुरीने आघाडी घेतली होती. पहिले चार गुण मिळवल्यानंतर तिने सामन्यावर पकड बनवली. परंतु आकांक्षाने 4-4 आणि 5-5, 6-6 अशी बरोबरी साधली. परंतु ऐनवेळी मयुरीने गुण घेत पहिला सेट जिंकला.
दुसर्‍या सेटमध्येही पहिले पाच गुण घेऊन मयुरी पुढे होती. परंतु आकांक्षाने नंतर गिअर बदलला. फोरहँड, बॅकहँडचे फटके मारून तिने गुण घेण्यास सुरुवात केली. सहा-सहा गुण बरोबरी झाली. नंतर आकांक्षाने एक गुण घेत दुसरा सेट (7-6) जिंकून सामन्यात चुरस निर्माण केली.
तिसर्‍या सेटमध्ये मयुरी आघाडीवर राहिली. पहिले चार गुण घेत तिने आकांक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आकांक्षा दोन गुणांवर होती. तेव्हापासून खेळाचा नूर पालटला. दोघीही एकेका गुणांसाठी झगडत होत्या. त्यांना प्रत्येकी तीन अ‍ॅडव्हान्टेज मिळाले. परंतु तिसरा महत्त्वाचा पॉईंट ही आकांक्षानेच घेतला. चौथाही गुण सहज घेतला. चार-चार अशी बरोबरी झाल्याने मयुरी बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले, त्यामुळे पाचवा गुणही आकांक्षानेच घेतला. दबावात आलेल्या मयुरीवर तिने पुन्हा एक महत्त्वपूर्ण गुण घेत सामना तिसर्‍या सेटमध्ये (6-4) जिंकला. एकेरीत सुवर्णपदक पटकावणारी आकांक्षा ही नवी मुंबईतील एएसए अकादमीत सराव करते.
एकेरीत सहज कांस्य
मुलींच्या एकेरीत महाराष्ट्राला कांस्यपदक सहजपणे पदक मिळाले. पुण्याच्या वैष्णवी आडकर आणि हरियाणाच्या श्रुती अहलावत यांच्यात कांस्य पदकासाठी सामना होता. परंतु या सामन्यात श्रुती गैरहजर राहिली. त्यामुळे वैष्णवी कांस्यपदकाची मानकरी ठरली.

वैष्णवी, सुदिप्ताला दुहेरीत रौप्यपदक
लॉन टेनिसमध्ये वैष्णवी आडकर आणि सुदिप्ता कुमार यांच्या संघाला रौप्यपदक मिळाले. त्यांना तामिळनाडूच्या लक्ष्मीप्रभा आणि जननी रमेश यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. पहिला सेट (7-5) महाराष्ट्राने जिंकून आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसरा सेट कर्नाटकच्या खेळाडूंनी 6-2 असा जिंकला. त्यामुळे सामना टायब्रेकरवर गेला. यात कर्नाटकच्या लक्ष्मीप्रभा व जननी रमेशने आक्रमक सुरुवात केली. त्यांचे सात गुण होईपर्यंत महाराष्ट्र 0 गुणावर होता. नंतर दोघींनी आक्रमण सुरू केले, त्यामुळे स्कोअर 5-9वर गेला. मात्र, कर्नाटकने एक गुण घेत सामन्यासह सुवर्णपदक जिंकले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news