Zimbabwe vs Australia T20 WC 26: झिम्बाब्वे कांगारूंविरूद्ध 'चुकून' जिंकला नाही; ही तर त्यांची जुनीच सवय... ग्रुपचं गणित बदललं

Zimbabwe vs Australia T20 WC 26
Zimbabwe vs Australia T20 WC 26pudhari photo
Published on
Updated on

Zimbabwe vs Australia T20 WC 2026: यंदाच्या टी २० वर्ल्डकपमध्ये तुलनेने दुबळे समजेले संघ मोठमोठ्या संघांना चांगलाच घाम फोडत आहेत. आज झालेल्या झिम्बाब्वे विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेने २० षटकात २ बाद १६९ धावा ठोकल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात खेळताना ऑस्ट्रेलियाला १९.३ षटकात १४६ धावाच करता आल्या. झिम्बाब्वेकडून १७ धावात ४ विकेट घेणाऱ्या ब्लेसिंग मुझाराबानी हा सामनावीर ठरला.

Zimbabwe vs Australia T20 WC 26
PCB vs ICC T20 WC: पाकिस्तानचे 'गिरे तो भी टांग उपर'... म्हणे आम्हाला ICC ची गरजच नाही, त्यांनीच माघार घेतली

१०० % विनिंग पर्सेंटेज

विशेष म्हणजे झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला लक म्हणून हरवलं नाही तर त्यांची टी २० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवण्याची जुनीच सवय आहे. त्यांनी यापूर्वी कधीही टी २० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारलेला नाही. यापूर्वी झिम्बाब्वेने २००७ च्या पहिल्या टी २० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. आता २०२६ च्या टी २० वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेने पुन्हा एकदा हा कारनामा करून दाखवला आहे.

Zimbabwe vs Australia T20 WC 26
Pakistan Team Humiliation: पाकिस्तानी टीमचा घोर अपमान! हॉटेलचं बील न भरल्यामुळं खेळाडूंना रस्त्यावरच...

ग्रुप B मध्ये कोण आहे टॉपवर?

ऑस्ट्रेलियाच्या पराभवामुळं ग्रुप B मधील गणित चांगलंच रंजक झालं आहे. सध्या ४ गुण आणि ३.१२ नेट रन रेटसह श्रीलंका अव्वल स्थानावर आहे. त्या खालोखाल ४ गुणं आणि १.९८ नेट रनरेटसह झिम्बाब्वे दुसऱ्या स्थानावर आहे. तर बलाढ्य ऑस्ट्रेलिया २ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जर श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाला मात दिली तर श्रीलंका आणि झिम्बब्वे हे दोन संघ सुपर ८ साठी पात्र होतील अन् झिम्बाब्वे हा भारताच्या गटात असेल.

झिम्बाब्वेची दमदार फलंदाजी

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने २० षटकात २ बाद १६९ धावा ठोकल्या. त्यात सलामीवीर ब्रायन बेनेटने नाबाद ६४ धावा केल्या. तर दुसरा सलामीवीर मारूमानीने ३५ धावांचे योगदान दिलं. त्यानंतर आलेल्या रायन ब्रंटने देखील ३५ धावा केल्या तर सिकंदर रझाने २५ धावा करत संघाला १६९ धावांपर्यंत पोहचवलं. ऑस्ट्रेलियाकडून स्टॉयनिस आणि ग्रीननं प्रत्येकी १ विकेट घेतली.

मुझाराबानीचा भेदक मारा

झिम्बब्वेचे विजयासाठीचे १७० धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली. झिम्बाब्वेच्या वेगवान माऱ्यासमोर त्यांची अवस्था ४ बाद २९ धावा अशी बिकट झाली होती. मुझाराबानीने कांगारूंना पाठोपाठ धक्के देण्यास सुरूवात केली होती.

ही पडझड रॅनशॉ आणि मॅक्सवेल यांनी थोपवण्याचा प्रयत्न केला. ग्लेन मॅक्सवेलने ३१ तर रॅनशॉने ६५ धावांचे योगदान दिलं. मात्र रॅनशॉ बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पराभवावर शिक्कामोर्तब झालं. त्यांचा संपूर्ण डाव १९.३ षटकात १४६ धावात संपुष्टात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news