WTC पॉइंट टेबलमध्ये टीम इंडियाला बंपर फायदा! भारताच्या विजयामुळे मोठा फेर बदल

WTC Points Table : बांगलादेशची चौथ्यावरून सहाव्या स्थानी घसरण
Team India WTC Points Table
टीम इंडियाच्या या विजयामुळे 2023-25 ​​च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले आहेत. Twitter
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India WTC Points Table : भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 280 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. चेन्नई कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात बांगलादेशसमोर 515 धावांचे मोठे लक्ष्य होते, परंतु खेळाच्या चौथ्या दिवशी त्यांचा दुसरा डाव 234 धावांमध्ये संपुष्टात आला. टीम इंडियाच्या या विजयामुळे 2023-25 ​​च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले आहेत. भारतीय संघ पहिल्या स्थानावर कायम असून आपले स्थान मजबूत आणखी केले आहे.

बांगलादेश सहाव्या स्थानावर

चेन्नई कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघाची विजयाची टक्केवारी 71.67 झाली आहे. या टक्केवारीसह रोहितसेना पहिल्या स्थानावर कायम आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. त्यांच्या विजयाची टक्केवारी 62.50 आहे. चेन्नई कसोटी गमावल्यानंतर बांगलादेशला (विजयाची टक्केवारी 39.29) नुकसान झाले आहे. त्यांची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी बांगलादेशचा संघ डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत इंग्लंड आणि श्रीलंकेला मागे टाकून त्यांच्या पुढे गेला होता. पण आता तो परत मागे पडला आहे.

इंग्लंड आणि श्रीलंकेला भारताच्या विजयाचा फायदा

भारतीय संघाच्या विजयामुळे श्रीलंका संघ आता WTC 2023-25 ​​च्या गुणतालिकेत 42.86 टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे. तर इंग्लंड 42.19 टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडची विजयाची टक्केवारी सध्या 50 असून हा तिसऱ्या स्थानावर आहे. गुणतालिकेत शेवटच्या तीन स्थानांवर अनुक्रमे दक्षिण आफ्रिका (सातव्या), पाकिस्तान (आठव्या) आणि वेस्ट इंडिज (नवव्या) हे संघ आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news