WTC Final AUS vs SA : स्मिथ-ब्यू वेबस्टरच्या अर्धशतकांनी कांगारूंचा डाव सावरला

द. आफ्रिका पहिल्या सत्रात वरचढ ठरली. त्यांच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले.
WTC Final
Published on
Updated on

आयसीसी विश्व टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025 च्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस आज लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ढगाळ हवामान आणि गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीमुळे हा निर्णय योग्य ठरला. लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने 23.2 षटकांत 4 बाद 67 धावा केल्या, तर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पहिल्या सत्रात आपले वर्चस्व गाजवले.

पण उपहारानंतर स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला आणि 76 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने ब्यू वेबस्टर च्या साथीने 79 धावांची भागीदारी करत संघाला स्थिरता दिली. पण एडन मार्करमने स्मिथला 66 धावांवर बाद करत करत दक्षिण आफ्रिकेला पुन्हा आघाडी मिळवून दिली. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलिया संघ 42 षटकांत 5 बाद 146 धावांवर खेळत होता.

स्मिथचा विक्रम

स्मिथने लॉर्ड्सवर 555 धावा करत वॉरन बार्डस्लेला मागे टाकले आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या परदेशी फलंदाजांमध्ये दुसरा क्रमांक मिळवला.

सामन्याचा आढावा :

दक्षिण आफ्रिकेची आघाडी : दक्षिण आफ्रिकेची आघाडी: कागिसो रबाडाने सातव्या षटकात दोन गडी बाद करत ऑस्ट्रेलियाला सुरुवातीचे धक्के दिले. उस्मान ख्वाजा (0) आणि कॅमेरॉन ग्रीन (4) यांना त्याने तंबूत पाठवले. त्यानंतर मार्को यान्सनने 18व्या षटकात मार्नस लाबुशेन (17) आणि लंचच्या ठीक आधी 23.2 व्या षटकात ट्रॅव्हिस हेड (11) यांना बाद करत द. आफ्रिकेची पकड मजबूत केली.

ऑस्ट्रेलियाची अवस्था : लंचपर्यंत ऑस्ट्रेलिया 67/4 अशी बिकट अवस्थेत आहे. स्टीव्ह स्मिथ आणि ब्यू वेबस्टर सध्या खेळपट्टीवर असून, दुसऱ्या सत्रात त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. स्मिथने जवळपास दोन तास खेळपट्टीवर टिकून राहत काही महत्त्वाच्या धावा जोडल्या, पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी त्याला बांधून ठेवले आहे.

गोलंदाजीतील वैशिष्ट्य : रबाडा आणि यान्सन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. रबाडाने आपल्या तिखट गोलंदाजीने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना त्रस्त केले, तर यान्सनने हेडला लेग साइडला झेलबाद करत लंचपूर्वी मोठा धक्का दिला. लुंगी नगिडी आणि केशव महाराज यांनीही काटक गोलंदाजी करत धावगतीवर नियंत्रण ठेवले.

प्रमुख खेळाडू आणि रणनीती

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा हा सामन्याचा मुख्य हत्यार आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 10 कसोटी सामन्यांत त्याने 49 बळी घेतले असून, आजही त्याने आपली छाप पाडली.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स 300 बळींच्या ऐतिहासिक टप्प्यापासून फक्त 6 बळी दूर आहे. मात्र, पहिल्या सत्रात त्यांचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांपुढे अडखळले.

लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर गवत आणि ढगाळ हवामानामुळे गोलंदाजांना मदत मिळत आहे. माजी इंग्लंड खेळाडू मॉन्टी पानेसर यांच्या मते, जोश हॅझलवूड लॉर्ड्सच्या उताराचा फायदा घेऊ शकतो, पण आज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी बाजी मारली.

प्रसारण आणि थेट प्रक्षेपण :

हा सामना भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होत आहे. लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइट उपलब्ध आहे. ऑस्ट्रेलियात प्राइम व्हिडिओवर सामना पाहता येईल, तर काही देशांमध्ये ICC.TV वर मोफत थेट प्रक्षेपण उपलब्ध आहे.

दक्षिण आफ्रिका पहिल्या सत्रात वरचढ ठरली. त्यांच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. स्टीव्ह स्मिथ आणि ब्यू वेबस्टर दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाला सावरण्याचा प्रयत्न करतील. पण रबाडा आणि यान्सन यांचा भेदक मारा त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरेल. क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना रोमांचकारी ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news