Cricket Records : महिला ‘वनडे’ क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+ धावांच्या खेळी करणाऱ्या टॉप-5 खेळाडू

Cricket Records : महिला ‘वनडे’ क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+ धावांच्या खेळी करणाऱ्या टॉप-5 खेळाडू

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सध्या सुरू असलेल्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय महिला संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात मानधनाने झळकावलेल्या दमदार शतकी खेळीमुळे ती महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०+ धावांच्या खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टॉप ५ मध्ये पोहोचली आहे. जाणून घेऊया महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०+ धावांच्या खेळी करणाऱ्या खेळाडूंची माहिती.

1. मिताली राज (भारत)

भारतीय संघाची माजी कर्णधार आणि महिला क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या मिताली राज या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. तिने आपल्या वनडे कारकिर्दीत एकूण २३२ सामने खेळले. त्यातील २११ डावांमध्ये मितालीने ५०.६८ च्या उत्कृष्ट सरासरीने ७८०५ धावा फटकावल्या. यात ७ शतके आणि ६४ अर्धशतकांचा समावेश आहे. म्हणजेच तिने एकूण ७१ वेळा ५०+ धावा केल्या.

2. चार्लोट एडवर्ड्स (इंग्लंड)

इंग्लंड संघाची माजी कर्णधार आणि उत्कृष्ट फलंदाज चार्लोट एडवर्ड्स या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. चार्लोटने इंग्लंडसाठी १९१ वनडे सामने खेळले. ज्यातील १८० डावांमध्ये फलंदाजी करताना तिने ३८.१६ च्या सरासरीने ५९९२ धावा केल्या. यात ९ शतके आणि ४६ अर्धशतके फटकावली. तिने एकूण ५५ वेळा ५०+ धावा केल्या.

3. सूजी बेट्स (न्यूझीलंड)

न्यूझीलंड महिला संघाची माजी कर्णधार सूजी बेट्स या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. तिनी १७१ वनडे सामन्यांच्या १६४ डावांमध्ये फलंदाजी करताना ३९.८३ च्या सरासरीने ५८९६ धावा केल्या. यामध्ये १३ शतके आणि ३७ अर्धशतकांसह एकूण ५० वेळा तिने ५०+ धावा केल्या.

4. स्टेफनी टेलर (वेस्ट इंडिज)

वेस्ट इंडिज महिला संघाची आक्रमक फलंदाज स्टेफनी टेलर हिचा समावेश धडाकेबाज खेळाडूंच्या यादीत होतो. स्टेफनीने १७० वनडे सामन्यांमधील १६३ डावांमध्ये फलंदाजी करताना ४२.२५ च्या सरासरीने ५८७३ धावा केल्या आहेत. यामध्ये ७ शतके आणि ४१ अर्धशतकांसह एकूण ४८ वेळा तिने ५०+ धावा केल्या.

5. स्मृती मानधना (भारत)

भारतीय संघाची धडाकेबाज सलामी फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मानधना या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. तिने दक्षिण आफ्रिकेची खेळाडू लॉरा वोलवार्डटला मागे टाकले. मानधनाने आतापर्यंत १०७ वनडे सामन्यांच्या १०७ डावांमध्ये फलंदाजी करताना ४७.१५ च्या सरासरीने ४७६३ धावा केल्या आहेत. यात १२ शतके आणि ३२ अर्धशतकांसह एकूण ४४ वेळा तिने ५०+ धावा केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news