Sanju Samson CSK | संजू सॅमसन सीएसकेमध्ये जाणार? बदल्यात राजस्थान रॉयल्सकडून दोन खेळाडूंची मागणी...

Sanju Samson CSK | संजुसाठी कोलकाता नाईट रायडर्सही इच्छुक?
संजू सॅमसन
संजू सॅमसन Twitter
Published on
Updated on

IPL Sanju Samson CSK trade news

नवी दिल्ली : आयपीएलमधील एक मोठी घडामोड समोर आली आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि स्टार विकेटकीपर-बॅट्समन संजू सॅमसन याने फ्रँचायझीकडे अधिकृतरीत्या विनंती केली आहे की, त्याला आयपीएल 2026 लिलावापूर्वी ट्रेड किंवा रिलिझ करण्यात यावे. Cricbuzz, ESPN Cricinfo, इंडियन एक्सप्रेस यांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

सॅमसन CSK मध्ये जाण्याच्या तयारीत!

चेन्नई सुपर किंग्स (CSK) या पाच वेळा आयपीएल जिंकलेल्या संघाने संजू सॅमसनला आपल्या संघात सामावून घेण्यास उत्सुकता दाखवली आहे. आयपीएल 2025 संपल्यानंतर सॅमसन यांनी अमेरिकेमध्ये CSK व्यवस्थापन व मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांची भेट घेतल्याचेही समजते.

राजस्थानची अट- दोन खेळाडू हवेत!

Indian Express ने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्सने संजू सॅमसनसाठी रोख रक्कम देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, राजस्थान रॉयल्सला रोख रक्कम नको असून, त्यांना CSK कडून दोन खेळाडू एक्सचेंजमध्ये हवे आहेत. यामुळेच सध्या ही चर्चा अडकली आहे.

संजू सॅमसन
IND vs PAK Asia Cup 2025 | भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार की नाही? इमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे COO स्पष्टच बोलले...

राजस्थान का सोडत आहे संजू?

वृत्तानुसार, संजू सॅमसन व राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनामध्ये मतभेद झाले असून त्यामुळे त्याने ही मागणी केली आहे. सॅमसन 2013 पासून राजस्थानकडून खेळत आहेत आणि तो संघाकडून सर्वाधिक सामने खेळला आहे.

सर्वाधिक धावा करणारा तो संघाचा यशस्वी कर्णधार आहे. 2022 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघ फायनलपर्यंत पोहोचला होता.

संजू सॅमसन सलामीला खेळायला येतो. तथापि, यंदाच्या आयपीएलमध्ये यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी सलामीवीर जोडीवर स्थान पक्के केले आहे. त्यामुळे संजूला चौथ्या स्थानी खेळायला यावे लागते.

आणखी कोणते संघ सॅमसनसाठी इच्छुक?

केवळ चेन्नईच नव्हे, तर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघही संजू सॅमसनमध्ये रस घेत आहे. सॅमसन याआधी 2012 मध्ये KKR संघाचा भाग होता, परंतु त्यांना एकही सामना खेळायला मिळाला नव्हता. तरीही, "संजूला चेन्नईमध्येच जाण्याची अधिक इच्छा आहे," असे सूत्रांकडून समजते.

ट्रेड झाला नाही, तर लिलावात दिसणार?

जर राजस्थान व चेन्नई यांच्यात करार झाला नाही, तर संजू सॅमसन IPL 2026 च्या लिलावात उतरतील, अशी शक्यता बळावली आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये आयपीएलमधील मोठा ट्रेड किंवा लिलावातील मोठी घडामोड होऊ शकते.

संजू सॅमसन
MS Dhoni | पिवळ्या जर्सीतच, पण नव्या भूमिकेत? महेंद्रसिंग धोनीच्या सूचक विधानाने चर्चेला उधाण

संजू सॅमसनची IPL कारकिर्द

  • सामने: 177

  • धावा: 4704

  • शतकं: 3

  • अर्धशतकं: 26

  • संघ: राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स

  • कर्णधार म्हणून यश: IPL 2022 फायनल गाठली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news