

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी स्टार ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ब्रेट लीने भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा या दोन दिग्गज खेळाडूंना बहुप्रतिक्षित बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी सल्ला दिला आहे. या वर्षी आतापर्यंत कोहली आणि रोहित दोघांनीही त्यांचा सर्वोत्तम फॉर्म शोधण्यासाठी संघर्ष केला आहे, ज्यामुळे भारताच्या न्यूझीलंडविरुद्धच्या अलीकडील 0-3 अशा मालिका पराभवानंतर टिकेची छोड दोघांवर सुरु झाली. रोहितने यावर्षी 11 सामन्यांत 29.40 च्या सरासरीने दोन शतके आणि दोन अर्धशतकांसह 588 धावा जमा केल्या आहेत. दरम्यान, कोहलीने सहा सामन्यांत केवळ एका अर्धशतकासह 22.72 च्या सरासरीने 250 धावा केल्या आहेत.ॉWTC अंतिम सामन्यात जाण्यासाठी हा आहे मार्ग
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC) मध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाला 4-1 ने नमवने गरजेचे आहे. त्यामुळे आता स्टार खेळाडूंचा असलेला फॉर्म एक महत्त्वपूर्ण चिंतेचा आहे. कोहली आणि रोहितची कामगिरी भारताच्या सलग तिसऱ्या WTC फायनलमध्ये जाण्याच्या संधींसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
विराट आणि रोहितचा मागील काही सामन्यांमधील फॉर्म हा भारतासाठी चिंतेचा विषय बनलेला आहे. यावर भाष्य करत ऑस्टेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने त्यांना सल्ला दिला आहे. यावेळी ते म्हणाले, "दोन्ही फलंदाज त्यांच्या तंत्रावर काम करू शकतात. त्याचबरोबर थोडे ताजेतवाने होऊ शकतात. त्यामुळे दोघांनी फॉर्म परत मिळवण्यासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे".
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावस्कर मालिकेला 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे पहिल्या कसोटीने सुरुवात होणार आहे. ॲडलेड ओव्हल येथे 6 ते 10 डिसेंबर दरम्यान नियोजित होणारी दुसरी कसोटी 'डे-नाईट' स्वरूपात होणार आहे. त्यानंतर 14 ते 18 डिसेंबर दरम्यान तिसरी कसोटी ब्रिस्बेन द गाबा या मैदानावर खेळवली जाणार आहे. तर चौथी कसोटी ही मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 26 ते 30 डिसेंबर दरम्यान होणारी प्रथागत बॉक्सिंग डे कसोटी मालिका होणार आहे. तर 3 ते 7 जानेवारी दरम्यान सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणारी पाचवी आणि शेवटची कसोटी होणार आहे.
मागील काही वर्षांत भारताने ऑस्ट्रेलियावर मालिकेत पुन्हा आघाडी मिळवली आहे. भारताने 2018-19 आणि 2020-21 हंगामात ऑस्ट्रेलियात दोन विजयांसह सलग चार मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकल्या आहेत. 2014-15 च्या हंगामात भारताने 10 वेळा आणि ऑस्ट्रेलियाने 5 वेळा सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेच वरचढ ठरु शकतो.