
पुढारी ऑनलाईन डेस्क : Border Gavaskar Trophy : भारतीय संघ 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) म्हणून ओळखली जाते. जाणून घ्या, BGT मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप-5 खेळाडू कोण आहेत?
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. बीजीटीमधील 34 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 25 षटकार मारले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनच्या नावावर बीजीटीमध्ये 18 कसोटी सामन्यांमध्ये 24 षटकार आहेत.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 29 कसोटी सामने खेळले आणि 16 षटकार मारले आहेत.
कर्णधार रोहित शर्मा या यादीत संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे. 'हिटमॅन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितने बीजीटीमध्ये 11 कसोटी सामन्यांमध्ये 15 षटकार ठोकले आहेत. मुरली विजयने 15 सामन्यात 15 षटकार ठोकले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल क्लार्क पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने भारताविरुद्ध 22 कसोटी सामने खेळले आणि 14 षटकार मारले.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली या यादीत कुठेही नाही. बीजीटीमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो संयुक्तपणे 26व्या क्रमांकावर आहे. त्याने 24 कसोटी सामन्यांमध्ये केवळ 5 षटकार मारले आहेत. त्याच्याशिवाय 9 खेळाडूंनी बीजीटीमध्ये 5 षटकार मारले आहेत.