Viral Video : चाहत्यांनी ओलांडली मर्यादा! रोहित शर्माची 'प्रतिक्रिया' सोशल मीडियावर तुफान व्हायरल

कारमधून जाताना दोघा तरुणांनी सेल्‍फी काढण्‍यासाठी हात ओढण्‍याचा प्रयत्‍न
Rohit Sharma viral video
रोहित शर्माचा एक व्‍हिडिओ सध्‍या सोशल मीडियावर चांगलाच व्‍हायरल होत आहे. यामध्‍ये चाहते त्‍याच्‍याशी गैरवर्तन करताना दिसत आहेत.
Published on
Updated on
Summary

टीम इंडियाचा स्‍टार फलंदाज रोहित शर्मावरील चाहत्‍यांचे असणारे प्रेम सर्वश्रूत आहेच. त्‍याचबरोबर चाहत्‍यांप्रती त्‍याची आपुलकीही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. बहुतांशवेळा सराव सत्रानंतर रोहित आपल्‍या समर्थकांना भेटायला जातो, त्यांच्यासोबत सेल्फी काढतो आणि ऑटोग्राफही देतो.

Rohit Sharma viral video

नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्‍टार फलंदाज रोहित शर्मा हा सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूपैकी एक. त्‍याच्‍यावर चाहत्‍यांचे असणारे प्रेम सर्वश्रूत आहेच. त्‍याचबरोबर चाहत्‍यांप्रती त्‍याची आपुलकीही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. बहुतांशवेळा सराव सत्रानंतर रोहित आपल्‍या समर्थकांना भेटायला जातो, त्यांच्यासोबत सेल्फी काढतो आणि ऑटोग्राफही देतो. मात्र आता रोहित शर्माचा एक व्‍हिडिओ सध्‍या सोशल मीडियावर चांगलाच व्‍हायरल होत आहे. यामध्‍ये चाहते त्‍याच्‍याशी गैरवर्तन करताना दिसत आहेत.

नेमकं काय घडलं?

व्‍हायरल व्‍हिडिओमध्‍ये दिसतं की, रोहित शर्मा आपल्‍या कारमधून जात असताना दोन किशोरवयीन चाहते त्याच्याजवळ येतात. रोहितने हात हलवून अभिवादन करताच त्यातील एकाजण त्याच्याशी हस्तांदोलन प्रयत्‍न करतो. त्यानंतर दोघांनीही सेल्फी काढण्यासाठी त्याचा हात ओढण्याचा प्रयत्न केला. चाहत्यांच्या या वर्तनामुळे नाराज झालेल्या रोहितने शांतपणे त्यांना समज दिली आणि त्यानंतर गाडीची काच वर घेतली.

देशातंर्गत स्‍पर्धेत रोहितचे दमदार शतक

रोहित शर्मा सध्या मुंबईकडून विजय हजारे करंडक स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये आहे. सिक्कीमविरुद्ध त्याने दमदार १५५ धावांची खेळी साकारली, मात्र उत्तराखंडविरुद्ध तो शून्यावर बाद झाला. आता ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत हा फॉर्म कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

Rohit Sharma viral video
Rohit Sharma : "मला क्रिकेट खेळायचे नव्हते" : रोहित शर्माचा निवृत्तीच्या विचारावर नवा खुलासा

मागील वर्ष रोहित शर्मासाठी अत्‍यंत यशस्‍वी

२०२५ हे वर्ष रोहित शर्मासाठी अत्यंत यशस्वी ठरले. या वर्षात त्याने केवळ मोठ्या धावा केल्या नाहीत, तर अनेक विक्रमांनाही गवसणी घातली. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत प्रथमच अव्वल स्थान पटकावण्याचा मान त्याने मिळवला. तसेच २० हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार करत भारताला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले.

Rohit Sharma viral video
Virat-Rohit : विजय हजारे ट्रॉफीत विराट, रोहितला किती मानधन मिळाले?

षटकाराचा विक्रम रोहितच्‍या नावे

रोहितची षटकार मारण्याची क्षमता आजही अद्वितीय आहे. नोव्हेंबरमध्ये रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने शाहिद आफ्रिदीचा ३५१ षटकारांचा विक्रम मोडत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावावर केला. सध्या रोहितच्या खात्यात २७९ एकदिवसीय सामन्यांत ३५५ षटकारांची नोंद आहे. २०२५ या वर्षाचा शेवट रोहितने १४ डावांत ६५० धावांसह केला. ५०.००च्या सरासरीने आणि १०० पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने धावा करत त्याने दोन शतके आणि चार अर्धशतके झळकावली, तर १२१ धावा नाबाद ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news