

हरारे : भारतीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात केवळ शतकी खेळीच केली नाही, तर षटकारांचा पाऊस पाडून क्रिकेट जगताला थक्क केले आहे. या खेळीदरम्यान वैभवने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या (U-19 world Cup) एका डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा १८ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे.
वैभवने आपल्या १७५ धावांच्या तुफानी खेळीत तब्बल १५ षटकार खेचले. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मायकल हिलच्या नावे होता, ज्याने २००८ मध्ये नामिबियाविरुद्ध १२ षटकार लगावले होते. विशेष म्हणजे, वैभवने आपलाच जुना विक्रम (१४ षटकार विरुद्ध यूएई) मोडीत काढत 'यूथ ODI' इतिहासात एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज होण्याचा बहुमान मिळवला आहे.
वैभवच्या या खेळीने भारताला केवळ भक्कम स्थितीत पोहोचवले नाही, तर जागतिक क्रिकेटमध्ये त्याच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे.
१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक शतकी खेळी साकारणाऱ्या वैभव सूर्यवंशीने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वैभवने आता अव्वल स्थान पटकावले असून, त्याने यापूर्वीच्या अनेक दिग्गजांचे विक्रम मोडीत काढले आहेत.
वैभवने या एकाच विश्वचषक हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसचा १८ षटकारांचा (२०२२) विक्रम मोडीत काढला. वैभवने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण २३ षटकार खेचले आहेत.
एका विश्वचषक हंगामात सर्वाधिक षटकार:
वैभव सूर्यवंशी: २३* (२०२६)
डेवाल्ड ब्रेविस: १८ (२०२२)
फिन ॲलन: १८ (२०१८)
केवळ षटकारच नव्हे, तर एकूण धावांच्या बाबतीतही वैभवने आपली चमक दाखवली आहे. १९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या शर्यतीत त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमला (१२७१ धावा) मागे टाकले आहे. तसेच, यूथ वनडे क्रिकेटच्या इतिहासात १०० षटकार ठरणारा तो जगातील पहिला फलंदाज बनला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशच्या जवाद अबरारच्या नावावर ५५ षटकार आहेत.
वैभवने या सामन्यात भारतासाठी १९ वर्षांखालील विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा मान मिळवला आहे. त्याने राज बावाचा (६९ चेंडू) विक्रम मोडीत काढला. जागतिक स्तरावर या स्पर्धेतील हे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. या यादीत न्युझीलंडचा विल मलाजुक (५१ चेंडू) पहिल्या क्रमांकावर आहे.
विश्वचषक फायनलमधील सर्वात वेगवान शतक.
एका विश्वचषक हंगामात सर्वाधिक २३ षटकार.
यूथ वनडे क्रिकेटमध्ये १०० षटकार मारणारा एकमेव फलंदाज.
१९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेटमध्ये बाबर आझमपेक्षा जास्त धावा.
वैभवने आजच्या सामन्यात ११९ धावा* (आणि पुढे १७५ पर्यंत मजल) करत भारताचा माजी कर्णधार उन्मुक्त चंद याचा विक्रम मोडला. उन्मुक्तने २०१२ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १११ धावांची संस्मरणीय खेळी केली होती. वैभव आता विश्वचषक फायनलच्या इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवणारा फलंदाज ठरला आहे.