Vaibhav Sooryavanshi world record|मुंबईविरुद्ध 'फ्लॉप शो' तरीही नवा रेकॉर्ड ! वैभव सूर्यवंशीच्‍या नावावर नवा जागतिक विक्रम

Vaibhav Sooryavanshi world record|आयपीएलमध्‍ये आतापर्यंत केल्‍या एकूण ५८३ धावा
Vaibhav Sooryavanshi world record
वैभव सूर्यवंशी.Pudhari
Published on
Updated on

Vaibhav Sooryavanshi world record

मुंबई : राजस्थान रॉयल्सचा रविवारी (दि. २४) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या 'करा किंवा मरो' अशा सामन्यात सर्वांचे लक्ष वेधले होते युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्‍या फलंदाजीकडे. चाहत्‍यांना उत्तुंग षटकार, चौकारांची आतिषबाजीसह त्‍याच्‍याकडून अर्धशतक किंवा शतकाची अपेक्षा होती. मात्र वैभव ६ चेंडूत अवघ्या ४ धावावर बाद झाला. मात्र, या निराशाजनक कामगिरीनंतरही सूर्यवंशीने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे.

यंदाच्‍या आयपीएल हंगामात वैभवने केल्‍या ५७९ धावा

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी यंदाच्‍या आयपीएल हंगामात वैभव सूर्यवंशीच्‍या नावावर ५७९ धावा होत्‍या. रविवारच्‍या सामन्‍यात तो अपयशी ठरला. केवळ ४ धावांवर तो बाद झाला. मात्र आयपीएलच्‍या यंदाच्‍या हंगामातील त्याची एकूण धावसंख्या ५८३ वर पोहोचली.

Vaibhav Sooryavanshi world record
Vaibhav Suryavanshi IPL 2026 | "त्याला थांबवणे अशक्य!" : वैभव सूर्यवंशीबाबत गावस्करांनी सर्व IPL संघांना कोणता इशारा दिला?

एका स्‍पर्धेत सर्वाधिक धावा करणारा जगातील सर्वात युवा खेळाडू

वैभव सूर्यवंशी हा आता कोणत्याही एका टी-२० स्पर्धेत किंवा मालिकेत सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिला युवा खेळाडू ठरला आहे. आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये वैभव जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने १४ सामन्यांत ४१.६४ च्या उत्कृष्ट सरासरीने आणि २३२.२७ च्या थक्क करणाऱ्या स्ट्राईक रेटने ५८३ धावा ठोकल्या आहेत. या मोसमात त्याच्या नावावर एक शतक आणि तीन अर्धशतकेही आहेत.

Vaibhav Sooryavanshi world record
Vaibhav Suryavanshi IPL 2026 Record |वैभव सूर्यवंशीचा नवा धमाका; ५१४ चेंडूत प्रस्थापित केला नवा विक्रम !

वैभवने मोडित काढला देवदत्त पडिक्कलचा विक्रम

वैभवने सूर्यवंशीने देवदत्त पडिक्कलचा विक्रम मोडीत काढला आहे. देवदत्तने २०१९/२० च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान कर्नाटककडून खेळताना एका हंगामात ५८० धावा केल्‍या होत्‍या.

Vaibhav Sooryavanshi world record
Vaibhav Suryavanshi India Debut | वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री कधी? BCCI सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्टच सांगितलं!

'एलिमिनेटर' सामन्यात राजस्थानचा मुकाबला सनरायझर्स हैदराबादशी

राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा ३० धावांनी पराभव करत १६ गुणांसह प्लेऑफमधील चौथे आणि अंतिम स्थान निश्चित केले आहे.राजस्थानच्या या विजयामुळे पंजाब किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स प्‍लेऑफच्‍या शर्यतीतून बाद झाले आहेत. आता २७ मे रोजी होणाऱ्या 'एलिमिनेटर' सामन्यात राजस्थानचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होईल, तेव्हा पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा सूर्यवंशीवर असतील.

Vaibhav Sooryavanshi world record
Vaibhav Suryavanshi celebration |"ते काय होते हे मलाच...": वैभव सूर्यवंशीच्या 'त्‍या' सेलिब्रेशनवर नेमकं काय म्‍हणाला?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news