Rishabh Pant : व्हॉट्सॲप अनइन्स्टॉल केलं, फोनही बंद केला : 'त्‍या' चुकीनंतर ऋषभ पंतने स्वत:लाच दिली अशी शिक्षा

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील अपयशानंतर यशातील सातत्‍यासाठी केला कठोर सराव
Rishabh Pant
ऋषभ पंत. File Photo
Published on
Updated on

इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटीत सलग दोन शतके झळकावत भारताचा स्‍टार यष्‍टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याने पुन्‍हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्‍याने दोन्‍ही डावांमध्‍ये दोन शतके झळकावत अनेक विक्रम आपल्‍या नावावर केले. मात्र त्‍याची ही खेळी व्‍यर्थ ठरली! इंग्‍लंडने हा सामना ५ गडी राखून जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता आपल्‍या जबदरस्‍त खेळीमुळे फॉर्ममध्‍ये आलेला पंत २०२४-२५ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत अत्‍यंत निराशाजनक कामगिरी केली होती. यावेळी त्‍याच्‍यावर झालेल्‍या टीकेनंतर त्‍याने आपल्‍या वर्तनात आमुलाग्र बदल करत पुन्‍हा एकदा आपले अस्‍तित्‍व सिद्‍ध केलेआहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पाच सामन्‍यांत केवळ २२५ धावा

२०२४-२५ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पंतने पाच कसोटींमध्ये केवळ २२५ धावा केल्या, त्याचा सरासरी फक्त २८.३३ इतका होता. या मालिकेत त्याने केवळ २४ चौकार आणि ६ षटकार लगावले. भारताने ही मालिका १-३ अशा फरकाने गमावली होती.

Rishabh Pant
Rishabh Pant Century : ऋषभ पंतचा इंग्लंडवर ‘डबल’ प्रहार! एकाच कसोटीत दोन शतके झळकावून विश्वविक्रमाला गवसणी

'स्टुपिड, स्टुपिड, स्टुपिड..!' टीका सोशल मीडियावर तुफान व्‍हायरल

पंतच्या सर्वाधिक चर्चेत आलेल्या बाद होण्यापैकी एक म्हणजे मेलबर्न कसोटीत त्याने 'रॅम्प शॉट' खेळण्याचा प्रयत्न करताना दिलेला झेल. त्याच्या या बेजबाबदार खेळीवर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी तीव्र शब्‍दांमध्‍ये टीका केली होती. गावस्कर यांचा "स्टुपिड, स्टुपिड, स्टुपिड!" हे उद्‍गार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. यावेळी क्रिकेटप्रेमींनीही पंतवर चौफेर टीका केली होती.

Rishabh Pant
Rishabh Pant test century | ऋषभ पंतचे झंझावाती शतक; षटकार अन् कोलांटी उडी...

व्हॉट्सॲप अनइन्स्टॉल केलं, फोनही बंद केला

'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील मेलबर्न सामन्‍यात आलेल्‍या अपयशानंतर पंतने स्वतःला शिस्त लावण्‍यासाठी कठोर प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या मोबाईलमधून व्हॉट्सॲप अनइन्स्टॉल (हटवले) केले. तसेच फोनही बंद केला. यानंतर त्‍याने आपले संपूर्ण लक्ष केवळ आणि केव सरावावर केंद्रित केले होते. भारताचे माजी स्ट्रेंथ अ‍ॅण्ड कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया' शी बोलताना सांगितले की, ऋषभ पंतने दररोज अतिशय कठोर सराव सत्रं घेतली. तो मोकळा असला की मला थेट जिममध्ये ओढून नेत असे. थकवा असो वा इतर कोणतीही कामाची जबाबदारी – त्याला काही फरक पडत नव्हता. तो फक्त एवढंच म्हणायचा की, आपल्याला स्वत:वर काम करत राहायचं आहे. अंतिम सामन्याच्या दिवशी तो काहीसा अपराधी भावनेने माझ्याकडे आला आणि म्हणाला, 'आजचा दिवस सुट्टी घेऊ का?' मी त्याला स्पष्टपणे सांगितलं, 'आता वेळ आली आहे, तू विश्रांती घ्यायलाच हवी.'"

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news