
Rishabh Pant test century Ind vs Eng Test series
हेडिंग्ले : लीड्समध्ये सुरू असलेल्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत ऋषभ पंतने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दुसऱ्या दिवशी पंतने वादळी खेळी करत नाबाद शतकी खेळी साकारली आहे. त्याने 99 धावांवर असताना त्याने बशिरला षटकार मारून शतक साजरे केले. टेस्ट करियमधील हे पंतचे सातवे शतक आहे.
ऋषभ पंतने 146 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांसह 105 धावा करत शतक पूर्ण केलं. शतक पूर्ण करताच त्याने हेल्मेट काढत बॅट मैदानावर ठेवली, ग्लोव्ह्ज काढले आणि त्याची सेलिब्रेशनची सिग्नेचर कोलांटी उडी मारली. त्यानंतर गिलला मिठी मारत त्याने क्रीझकडे परतताना आकाशाकडे पाहत आभार मानले.
पंतने या सामन्यात आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 3000 धावा पूर्ण करणारा तो भारताचा चौथा आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वेगवान विकेटकीपर फलंदाज ठरला आहे.
त्याने ही कामगिरी केवळ 76 डावांत केली असून, या यादीत फक्त ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट (63 डाव) त्याच्या पुढे आहे. विशेष म्हणजे, पंतने हा विक्रम गाजवताना माजी कर्णधार एमएस धोनीचा विक्रम मोडला आहे.
टेस्ट करियर
सामने --- 43
इनिंग ---- 75
धावा ---- 3000 +
सरासरी ------ 42.11
शतक--------- 7
अर्धशतक--------- 15
हायस्ट स्कोअर------- नाबाद 159
पहिल्या दिवशी यशस्वी जायसवालने शतक झळकावले, तर केएल राहुल आणि शुभमन गिल यांनीही दमदार योगदान दिले.
पंतच्या या ऐतिहासिक खेळीमुळे भारतीय संघाला मोठा आधार मिळाला असून, इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी सामन्यात भारताची पकड मजबूत झाली आहे.