India Pakistan War : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अब्रूचे धिंडवडे! UAEने PSLच्या आयोजनाला लाथाडले, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

PSL 2025 अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आधी असे म्हटले जात होते की PSLचे उर्वरित सामने UAE मध्ये खेळवले जातील, परंतु तसे होऊ शकले नाही.
UAE denies hosting PSL 2025 PCB faces setback
Published on
Updated on

pcb declare pakistan super league 2025 postponed indefinitely

दुबई : भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावाच्या शिखरावर आहेत. पाकिस्तानने भारतातील जम्मू, नौशेरा, सांबा उधमपूर आणि पठाणकोट यासह अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे हल्ले हाणून पाडत शत्रू देशाचे मनसुबे उधळून लावले. दरम्यान, भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचीही प्रतिमा डागळली असून संयुक्त अरब अमिराती (UAE)ने PSL च्या आयोजनाच्या मागणीला लाथडले आहे. युएईच्या या निर्णयाने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तोंडावर आपटले आहे.

भारतासोबत सुरू असलेल्या लष्करी संघर्षानंतर PCB आणि फ्रँचायझी संघांनी PSLचे उर्वरीत सामने UAE मध्ये खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, स्थानिक प्रशासनाच्या परवानग्या आणि तांत्रिक कारणांमुळे UAE ने माघार घेतली. यामुळे PCB च्या नियोजनाचा फज्जा उडाला आहे. पीसीबीने याबाबत एक पत्रक जारी केले आहे. यात म्हटलेय की, ‘पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्यानुसार पीएसएल 2025 अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे खोटे म्हणणे पीसीबीने मांडून स्वत:ची झालेली बेअब्रू झाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे.

पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा मातीमोल

या नाट्यमय घडामोडीमुळे पाकिस्तान क्रिकेटच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. आता PSL च्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, नव्या यजमानदेशाच्या शोधासाठी बोर्ड धावपळ करत आहे. जगभरातील लीग स्पर्धा यशस्वीपणे पार पडत असताना, पाकिस्तान मात्र अजूनही स्थिरतेच्या शोधात भटकतो आहे. एकीकडे भारताची IPL जगावर राज्य करत आहे. तर दुसरीकडे PSL मात्र सामन्यांचे ठिकाणही शोधू शकत नाही, ही बाब PCB साठी लाजीरवाणीच ठरते.

UAE denies hosting PSL 2025 PCB faces setback
India-Pakistan Conflict : लेफ्टनंट कर्नल एमएस धोनी युद्धासाठी सज्ज! टेरिटोरियल आर्मी सक्रिय करण्याचे आदेश

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news