

पुढारी ऑनलाईन डेस्क : U19 Women's T20 World Cup : 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड या संघांची लढत होणार आहे. हा सामना शुक्रवारी (31 जानेवारी) भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता क्वालालंपूर (मलेशिया) येथे खेळला जाईल. या स्पर्धेत दोन्ही संघ अजूनही अपराजित आहेत. जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला या सामन्यात गोंगाडी त्रिशाकडून मोठ्या अपेक्षा असतील. टीम इंडियाच्या या सलामी फलंदाजाने गेल्या सामन्यात स्कॉटलंडविरुद्ध शतक झळकावून इतिहास रचला होता. त्रिशाने गोलंदाजीतही महत्त्वाचे योगदान दिले आहे. तर वैष्णवी शर्माने हॅटट्रिक घेऊन लक्षवेधी कामगिरी केली आहे.
भारताने पहिल्या सामन्यात यजमान मलेशियाला दहा विकेट्सने पराभूत केले. त्यानंतर, श्रीलंकेला 60 धावांनी आणि बांगलादेशला 8 विकेट्सनी मात दिली. सुपर सिक्स टप्प्यात टीम इंडियाने स्कॉटलंड विरुद्ध 150 धावांनी विक्रमी विजय मिळवला. निक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील संघासाठी, जी त्रिशाने स्कॉटलंडविरुद्ध 59 चेंडूत 110 धावा केल्या ज्यामध्ये 13 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. तर तिची सलामीची जोडीदार जी कमलिनीने 42 चेंडूत 51 धावा केल्या.
स्पर्धेत त्रिशाने पाच सामन्यांमध्ये 76 धावा केल्या. तिने 66 च्या सरासरीने 230 धावा केल्या आहेत. इंग्लंडची फलंदाज डेविना पेरिन 131 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने स्कॉटलंडला फक्त 58 धावांत गुंडाळले होते. आयुषी शुक्लाने आठ धावांत चार, वैष्णवी शर्माने पाच धावांत तीन आणि त्रिशाने सहा धावांत तीन बळी घेतले. वैष्णवीने आतापर्यंत 12 आणि आयुषीने 10 विकेट घेतल्या आहेत.
भारतीय संघाने गेल्या वर्षीच 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकले होते. त्यावेळी काळात शेफाली वर्मा टीम इंडियाची कर्णधार होती. अशा परिस्थितीत, टीम इंडिया ट्रॉफीचे आपल्याकडेच राखेल अशी खात्री चाहत्यांना आहे.
भारतीय अंडर-19 महिला संघ 31 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळेल. या सामन्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज आहे. सामन्याचे स्टार स्पोर्ट्सवर चॅनेलवर लाईव्ह प्रेक्षपण पाहता येईल. तर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर देखील उपलब्ध आहे.
निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), गोंगाडी त्रिशा, जी कमलिनी (यष्टीरक्षक), भाविका अहिरे (यष्टीरक्षक), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी द्रिथि, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम, वैष्णवी एस.
अॅबी नॉरग्रोव्ह (कर्णधार), फोबी ब्रेट, ऑलिव्हिया ब्रिस्डेन, टिली कोर्टनी कोलमन, ट्रुडी जॉन्सन, केटी जोन्स, चार्लोट लॅम्बार्ट, इव्ह ओ'नील, डेविना पेरिन, जेमिमा स्पेन्स, चार्लोट स्टब्स, अमृता सुरेनकुमार, पृषा थानावाला, एरिन थॉमस, ग्रेस थॉम्पसन.