Rohit-Virat ODI Series schedule : 'या' तारखेपासून रोहित-विराट पुन्हा दिसणार निळ्या जर्सीत; ‘असे’ आहे आगामी वेळापत्रक

विश्वचषकाची मोर्चेबांधणी सुरू! दिग्गजांची अग्निपरीक्षा
Rohit Sharma Virat Kohli ODI
File Photo.
Published on: 
Updated on: 

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा अद्याप सुरूच आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिका नुकतीच संपन्न झाली असून, भारताने ती ३-१ अशी दिमाखात जिंकली आहे. आता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, कसोटी सामन्यांच्या थरारानंतर भारतीय संघाची पुढील एकदिवसीय मालिकाही फारशी दूर नाही. पुढील महिन्यात टीम इंडिया पुन्हा एकदा तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ही मालिका कधी आणि कोणत्या संघाविरुद्ध होणार आहे, याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या आगामी मालिकेत भारताचे दोन दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा पुन्हा एकदा निळ्या जर्सीत खेळताना दिसतील, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुढील महिन्यात, अर्थात डिसेंबरमध्ये श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील पहिला सामना १३ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना १६ डिसेंबर रोजी बंगळुरू येथे खेळवला जाईल, तर मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना अहमदाबादच्या मैदानावर पार पडेल. या सामन्यासह या मालिकेची सांगता होईल. २०२६ या वर्षातील भारतीय संघाची ही शेवटची एकदिवसीय मालिका ठरणार आहे. त्यानंतर नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी महिन्यात झिम्बाब्वेचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून, दोन्ही देशांमध्ये ३ जानेवारीपासून एकदिवसीय मालिकेला प्रारंभ होईल.

Rohit Sharma Virat Kohli ODI
IND vs NZ Test : ५८ वर्षांत २ मालिका विजय! न्यूझीलंडमध्ये कशी आहे टीम इंडियाची कसोटी कामगिरी? कर्णधार गिलसमोर मोठे आव्हान

सध्या सुरू असलेल्या न्यूझीलंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिका संपल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा या दौऱ्यातील सहभाग संपुष्टात आला आहे. यापुढे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण कसोटी मालिकेत हे दोन्ही दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार नाहीत. या कसोटी मालिकेत युवा फलंदाज शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. दुसरीकडे, श्रीलंकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र, निवड समितीकडून जेव्हा संघ जाहीर केला जाईल, तेव्हा त्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीचा निश्चितपणे समावेश असेल, अशी अपेक्षा क्रीडा वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

Rohit Sharma Virat Kohli ODI
U19 Asia Cup controversy : "पाकिस्‍तानच्‍या खेळाडूंनी दिवाळीच्या दिवशी आम्‍हाला शिवीगाळ केली..." : यशवीर गौडचा मोठा खुलासा

पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. जगातील इतर प्रमुख संघांप्रमाणेच भारतीय संघानेही या महास्पर्धेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विश्वचषकासाठी आता एका वर्षापेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिल्याने सर्वच संघ जास्तीत जास्त एकदिवसीय सामने खेळण्यावर भर देत आहेत. मायदेशात आणि परदेशात मालिका खेळून संघाची योग्य रचना आणि सर्वोत्तम समतोल साधण्याचा प्रयत्न संघ व्यवस्थापनाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी मालिकांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची कामगिरी कशी राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे दोन्ही दिग्गज खेळाडू आगामी विश्वचषकात खेळणार की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नसले तरी, सध्याच्या मालिकांमधील खेळाडूंचा फॉर्म आणि कामगिरीच विश्वचषक संघातील त्यांचे स्थान निश्चित करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.