पंड्यावर कुणाचाही विश्वास नाही? सहकाऱ्यांनी सूर्यालाच का पसंती दिली? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

Hardik vs Suryakumar : ..म्हणून पंड्या ऐवजी सूर्याकडे नेतृत्व देण्याचे निश्चित
hardik pandya suryakumar yadav
टी-20 विश्वचषकानंतर पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये पंड्याला भारताचा भावी कर्णधार मानले जात होते. File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : Hardik Pandya vs Suryakumar Yadav : हार्दिक पंड्या हा भारताचा सर्वोत्तम सीम-बॉलिंग अष्टपैलू खेळाडू आहे, यात शंका नाही. अलीकडेपर्यंत, तो रोहित शर्मानंतर भारताचा सर्वोत्तम पांढऱ्या चेंडूचा कर्णधार मानला जात होता. कारण हार्दिकने जून 2022 ते ऑगस्ट 2023 दरम्यान 19 सामन्यांमध्ये (16 टी-20 आणि 3 वनडे) भारताचे नेतृत्व केले. त्यापैकी 12 सामने भारताने जिंकले. त्यामुळे या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकातही तो संघाचे नेतृत्व करेल असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. पण तसे झाले नाही. कारण रोहित शर्मा टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या योजनांचा एक भाग बनला. त्याला कर्णधार आणि हार्दिकला उपकर्णधार करण्यात आले.

पंड्या उपकर्णधार पदासाठीही योग्य नाही?

टी-20 विश्वचषकात दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. 2007 नंतर भारताने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. या विजेतेपदानंतर रोहित आणि विराट कोहली या दोघांनीही टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली. अशा परिस्थितीत उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणा-या हार्दिककडे कर्णधार पद सोपवले जाईल अशी शक्यता होती. निवड समितीने सर्वांनाच चकीत करत मोठा निर्णय घेतला. नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादवची भारतीय टी-20 संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड केली. हार्दिकला उपकर्णधारपदासाठीही योग्य मानले गेले नाही. ही जबाबदारी शुभमन गिलकडे देण्यात आली.

Hardik vs Suryakumar : इन्साईड स्टोरी काय आहे?

खरेतर टी-20 विश्वचषकानंतर पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये पंड्याला भारताचा भावी कर्णधार मानले जात होते. पण असे काय घडले ज्यामुळे हा अष्टपैलू खेळाडू अचानक साईड लाईन झाला? चल तर जाणून घेऊया या मागची इन्साईड स्टोरी.

हार्दिकची लोकप्रियता कशी कमी झाली?

टी-20 विश्वचषकात हार्दिकने भारताला अनेक वेळा बॅट आणि बॉलने विजय मिळवून दिला. मग बदलाचे कारण काय होते? हार्दिकला ही कठोर वागणूक देण्यामागचे कारण काय? भारतीय क्रिकेटमधील अनेक गोष्टींप्रमाणे याचेही उत्तर सरळ नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हार्दिकचा फिटनेस ही सर्वात मोठी समस्या होती. एकदिवसीय विश्वचषकात बांगलादेश विरुद्ध गट टप्प्यातील सामन्यात गोलंदाजी करताना या 30 वर्षीय अष्टपैलूला दुखापत झाली, जी गंभीर होती. त्यामुळे तो पाच महिने मैदानाबाहेर राहिला. (Hardik Pandya vs Suryakumar Yadav)

निवडकर्त्यांचा पंड्यावर विश्वास नाही?

पंड्याला गंभीर दुखापत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तो याधीही पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता, त्यामुळे तो जवळपास दोन वर्षे गोलंदाजी करू शकला नव्हता. टी-20 विश्वचषक अवघ्या सहा महिन्यांवर असताना, निवडकर्ते आणि मंडळाला त्याची कर्णधार म्हणून निवड करण्याबाबत विश्वास वाटला नाही. (Hardik Pandya vs Suryakumar Yadav)

अन् रोहितकडे नेतृत्व सोपवण्यात आले

दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा हृदयद्रावक पराभव झाला. कर्णधार रोहित आणि हेड कोच राहुल द्रविड यांचा स्वप्नभंग झाला. यानंतर रोहितला आयसीसी विजेतेपद जिंकण्याची आणखी एक संधी हवी होती. नव्या मोहिमेत त्याला द्रविड यांच्या साथीची गरज होती. त्यामुळे हेड कोच पदाचा कार्यकाळ संपूनही द्रविड यांना टी-20 विश्वचषक स्पर्धेपर्यंत मुदत वाढ घेण्याची विनंती करण्यात आली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्यामुळे रोहित नव्या दमाने टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीला लागला. अशातच हार्दिकच्या फिटनेसची स्थिती अनिश्चित झाली होती. परिणामी त्याचे नाव मागे पडले आणि रोहितकडे नेतृत्व सोपवण्यात आले.

पंड्या खेळाडूंचा विश्वास मिळवण्यात अपयशी

आयपीएलमध्येही हार्दिकचे प्रदर्शन खराब राहिले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि एक खेळाडू म्हणून त्याची कामगिरी अतिशय खराब झाली. त्यामुळे अनेकांचा त्यांच्या क्षमतेवरचा विश्वास उडाला. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हार्दिक त्याच्या मुंबई इंडियन्स संघातील सहकारी खेळाडूंचाही विश्वास जिंकू शकला नाही. त्यामुळे, बीसीसीआयनेही ही बाब गांभिर्याने घेतली. फ्रँचायझी क्रिकेट खेळताना संघाच्या खेळाडूंचा विश्वास मिळवण्यात अपयशी ठरणारा कर्णधार टीम इंडियाचे नेतृत्व मिळाल्यास तो संघाला एकसंध कसे ठेवणार? असा प्रश्न बोर्डासमोर निर्माण झाला. अशा परिस्थितीत रोहितकडेच नेतृत्व देण्याचे निश्चित झाले.’

पंड्या खेळाडूंचा विश्वास मिळवण्यात अपयशी

आयपीएलमध्येही हार्दिकचे प्रदर्शन खराब राहिले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि एक खेळाडू म्हणून त्याची कामगिरी अतिशय खराब झाली. त्यामुळे अनेकांचा त्यांच्या क्षमतेवरचा विश्वास उडाला. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हार्दिक त्याच्या मुंबई इंडियन्स संघातील सहकारी खेळाडूंचाही विश्वास जिंकू शकला नाही. त्यामुळे, बीसीसीआयनेही ही बाब गांभिर्याने घेतली. फ्रँचायझी क्रिकेट खेळताना संघाच्या खेळाडूंचा विश्वास मिळवण्यात अपयशी ठरणारा खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार झाल्यास तो संघाला एकसंध कसे ठेवणार? असा प्रश्न बोर्डासमोर निर्माण झाला. अशा परिस्थितीत रोहितकडेच नेतृत्व देण्याचे निश्चित झाले.’

Hardik vs Suryakumar : भारतीय खेळाडूंची ‘स्काय’ ला पसंती

पंड्याने वैयक्तिक कारणांमुळे श्रीलंका दौ-यातील वनडे मालिकेतून विश्रांती मागितली. ज्यामुळे गंभीरचा संशय खरा ठरला. दरम्यान, बीसीसीआयला खेळाडूंकडून अभिप्राय मिळाला. त्यांनी हार्दिकपेक्षा सूर्याच्या नावाला प्राधान्य दिले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोर्डाशी बोलताना खेळाडूंनी सूर्यावर अधिक विश्वास व्यक्त केला. यासाठी त्यांनी गेल्या वर्षी वनडे विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेदरम्यान सूर्याच्या कर्णधारपदाचा हवाला देण्यात आला. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मायदेशातील मालिका आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान सूर्यकुमारचा शांत दृष्टिकोन आणि संवाद कौशल्याने भारतीय खेळाडूंना प्रभावित केले. त्याची कर्णधारपदाची शैली रोहितसारखीच असून तो कसलाही आडपडदा न ठेवता समोरासमोरील संवादावर जोर देतो, असे अनेक खेळाडूंनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news