Team India Victory Parade : रोहित-विराट-सूर्याचा वानखेडे मैदानात डान्स!

टीम इंडियाच्या विजयी परेडसाठी लाखो चाहते मुंबईच्या रस्त्यावर
Team India Victory Parade
टीम इंडियाचे खेळाडू वानखेडे स्टेडियमवर पोहोचले आणि ढोल ताशांच्या तालावर नाचले.Twitter
Published on
Updated on

वानखेडेमध्ये चॅम्पियन्स थिरकले

टीम इंडियाचे खेळाडू वानखेडे स्टेडियमवर पोहोचले आणि ढोल ताशांच्या तालावर नाचले.

विजय परेडनंतर टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवर पोहोचली

विजय परेडनंतर टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवर पोहोचली. चॅम्पियन्सचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

बूम-बूम बुमराहचा जयघोष....

आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांनी मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठी गर्दी केली आहे. चाहते विश्वचषकाच्या विजयाचा जल्लोष करत आहेत. मुंबईचा राजा रोहित शर्मा, बूम-बूम बुमराह अशा घोषणा दिल्या जात आहेत. खरे तर बुमराहच्या शानदार गोलंदाजीचा या टीम इंडियाच्या विश्वविजयात महत्त्वाचा वाटा आहे. त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटने गौरविण्यात आले.

टीम इंडियाचा ताफा वांद्रे-वरळी सी लिंकवर

टीम इंडियाच्या ताफ्याने वांद्रे-वरळी सी लिंक ओलांडला. इथून नरिमन पॉइंट पर्यंतचा प्रवास सुमारे 30 मिनिटांचा आहे. नरिमन पॉइंटवर पोहोचल्यानंतर तेथून टीम इंडियाची विजयी यात्रा सुरू होईल.

मरीन ड्राईव्हवरील गर्दीतून रुग्णवाहिका बाहेर

मरीन ड्राईव्हवर जमलेल्या क्रिकेट चाहत्यांनी गर्दीतून रुग्णवाहिकेला जाण्यासाठी मार्ग दिला.

विमानतळावरून खेळाडू विजयी परेडसाठी रवाना

टीम इंडियाचे खेळाडू विमानतळावरून विजयी परेडसाठी रवाना झाले. विमानतळावरून बसमध्ये बसून खेळाडू मरीन ड्राइव्हला जात आहेत. येथे खुल्या बसमधून खेळाडूंची विजयी परेड काढण्यात येणार असून ती वानखेडे स्टेडियमवर संपेल.

चॅम्पियन्सचा विजय रथ गर्दीत अडकला

टी-20 वर्ल्डकप चॅम्पियन टीम इंडियाची 'विजय रथ' मुंबईत जमलेल्या चाहत्यांच्या गर्दीत अडकला. पोलिस कर्मचाऱ्यांनी जमावाला पांगवले आणि बस मरीन ड्राइव्हकडे जाण्यासाठी मार्ग तयार केला.

17 वर्षांनंतर उंचावला टी-20 विश्वचषक

दिनांक 29 जून 2024... टी-20 विश्वचषक फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे भारतीय संघ या फॉरमॅटमध्ये दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला. 29 जून रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासह भारताने ब्रिजटाऊन (बार्बाडोस) येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक उंचावला. या विजयानंतर भारतीय संघ आज मायदेशी परतला. टीम इंडियाच्या सदस्यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आता टीम इंडिया संध्याकाळी मुंबईत विजयी परेडमध्ये सहभागी होणार आहे. या पेजवर भारतीय संघाशी संबंधित सर्व अपडेट्स सातत्याने दिले जात आहेत. हे पेज रिफ्रेश करत रहा.

जल्लोषात स्वागत

विमानतळावर टीम इंडियाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुंबईत लाखो चाहते खेळाडूंची वाट पाहत आहेत. त्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

टीम इंडियाचे मुंबईत आगमन

टीम इंडियाच्या विजयी परेडसाठी लाखो चाहते मुंबईच्या रस्त्यावर जमले आहेत. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत चाहत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी केली आहे. चाहते आता विजयी परेड सुरू होण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, भारतीय संघाचे खेळाडू मुंबई विमानतळाबाहेर आले आहेत. विमानतळाबाहेर हजारो चाहत्यांची गर्दी झाली आहे. हार्दिक पंड्याच्या हातात वर्ल्ड कप ट्रॉफी दिसली. इथून खेळाडूंना बसने नरिमन पॉइंटवर नेण्यात येईल, तेथून टीम इंडियाची विजयी परेड सुरू होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news