T20 World Cup : 4,6,4,6,6,4.. इंग्लंडच्या सॉल्टने उडवला विंडीजच्या शेफर्डचा धुव्वा!

T20 World Cup : 4,6,4,6,6,4.. इंग्लंडच्या सॉल्टने उडवला विंडीजच्या शेफर्डचा धुव्वा!

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup : इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्टने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुपर-8 सामन्यात चौकार षटकारांची आतषबाजी केली. त्याने डावाच्या 17 व्या षटकात रोमारियो शेफर्डवर जोरदार आक्रमण करून अक्षरश: कॅरेबियन गोलंदाजाचा धुव्वा उडवला. या षटकात साल्टने तीन चौकार आणि तीन षटकार मारून 30 धावा वसूल केल्या. यासह तो युवराज सिंगनंतर टी-20 विश्वचषकात एकाच षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवीने 2007 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 षटकार मारून 36 धावा केल्या होत्या. सॉल्ट आता 30 धावांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

टी-20 विश्वचषकात एका षटकात एका फलंदाजाने फटकावलेल्या सर्वाधिक धावा (T20 World Cup)

36 – युवराज सिंग (भारत) विरुद्ध स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड), 2007
30 – फिल सॉल्ट (इंग्लंड) विरुद्ध रोमारियो शेफर्ड (वेस्ट इंडिज), 2024
29 – एबी डिव्हिलियर्स (द. आफ्रिका) विरुद्ध राशिद खान (अफगाणिस्तान), 2016
29 – जेहान मुबारक (श्रीलंका) विरुद्ध लॅमेक ओन्यांगो (केनिया), 2007
27 – डेव्हिड हसी (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध मोहम्मद सामी (पाकिस्तान), 2010

फिलिप सॉल्टने वेस्ट इंडिजने दिलेल्या 181 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 47 चेंडूत 7 चौकार आणि 5 गगनचुंबी खेळी करत 87 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने आणखी अनेक विक्रम आपल्या नावावर केले. (T20 World Cup)

टी-20 मध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारे इंग्लंडचे फलंदाज

32 – फिल सॉल्ट विरुद्ध वेस्ट इंडिज
26 – इऑन मॉर्गन विरुद्ध न्यूझीलंड
25 – जोस बटलर विरुद्ध ऑस्ट्रेलिया
24 – जोस बटलर विरुद्ध दक्षिण आफ्रिका

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा

478 – फिल सॉल्ट (9 डाव)
423 – ॲलेक्स हेल्स (13 डाव)
422 – ख्रिस गेल (14 डाव)
420 – निकोलस पूरन (15 डाव)
390 – जोस बटलर (16 डाव)

टी-20 विश्वचषकात इंग्लंडसाठी सर्वोच्च धावसंख्या (T20 World Cup)

116* – ॲलेक्स हेल्स विरुद्ध श्रीलंका, चटगाव, 2014
101* – जोस बटलर विरुद्ध श्रीलंका, शारजाह, 2021
99* – ल्यूक राइट विरुद्ध अफगाणिस्तान, कोलंबो आरपीएस, 2012
87* – फिल सॉल्ट विरुद्ध वेस्ट इंडीज, ग्रोस आयलेट, 2024
86* – ॲलेक्स हेल्स विरुद्ध भारत, ॲडलेड, 2022

फिल सॉल्ट विरुद्ध वेस्ट इंडिज (टी-20)

डाव : 9
धावा: 478
सरासरी: 68.28
स्ट्राईक रेट : 186.71
अर्धशतके : 2
शतके : 2
चौकार : 34
षटकार : 32

टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक

स्टुअर्ट ब्रॉड – 36 धावा (विरुद्ध भारत, 2007)
अजमतुल्ला उमरझाई – 36 धावा (विरुद्ध वेस्ट इंडिज, 2024)
जेरेमी गॉर्डन – 33 धावा (विरुद्ध यूएसए, २०२४)
इझातुल्ला दौलतझाई – 32 धावा (विरुद्ध इंग्लंड, 2012)
बिलावल भाटी – 30 धावा (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2014)
रोमारियो शेफर्ड – 30 धावा (विरुद्ध इंग्लंड, 2024)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news