Mumbai Metro : मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोची सफर जुलैपासून

-मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून मिळणार दिलासा
Mumbai Metro Photo
मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोची सफर जुलैपासूनMetro File Photo

मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून वाट पहात असलेल्या भुयारी मेट्रोची सफर मुंबईकरांना लवकरच करता येणार आहे. येत्या जुलै महिन्यापासून कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ मार्गातील आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा प्रवासीसेवेत दाखल होणार आहे. या पहिल्या टप्यात २७ रेल्वे स्थानकांचा समावेश असून यापैकी २६ स्थानके भुयारी आहेत. आरे ते बीकेसी या पहिल्या टप्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे.

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने महत्त्वाच्या अशा रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनच्या (आरडीएसओ) चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आता भुयारी मेट्रो सेवेत दाखल करण्यासाठीच्या अंतिम चाचणीला अर्थात मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्या चाचणीला लवकरच सुरुवात होणार आहे. सीएमआरएसच्या चाचण्यांच्या अनुषंगाने सध्या मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) अंतर्गत चाचण्या सुरू आहेत.

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ या ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रोचे काम सुरू आहे. ही मार्गिका तीन टप्प्यात वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय एमएमआरसीने घेतला आहे. आरे ते बीकेसी, बीकेसी ते वरळी आणि वरळी ते कुलाबा अशा तीन टप्प्यात ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होईल.

स्थानके कोणती ?

कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल मेट्रो, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, सीतलादेवी, धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रूझ, देशांतर्गत विमानतळ, सहार रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी, सीप्झ आणि आरे डेपो.

ट्रेनची वेळ काय

भूमिगत मेट्रो सेवा सकाळी साडे सहा वाजता सुरू होईल आणि रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहील. ताशी ९० किमी वेगाने धावणाऱ्या ट्रेन्स दर काही मिनिटांनी प्रवाशांसाठी उपलब्ध होतील.

दिल्ली मेट्रो करणार देखभाल

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोच्या ३ च्या ऑपरेशन आणि देखभालीचे १० वर्षाकरिता कंत्राट दिले आहे. ऑपरेशन कंट्रोल सेंटर, डेपो कंट्रोल सेंटर, स्टेशन्स, धावत्या ट्रेन्स, ट्रेन्सची देखभाल आणि सर्व मेट्रो सिस्टम इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे यासह मेट्रो लाइनच्या दैनंदिन कामकाजासाठी दिल्ली मेट्रो जबाबदार असेल.

राज्य सरकारचा हिस्सा एमएमआऱडीए ऐवजी थेट एमएमआरसीला

मेट्रो ३ लवकर सुरू करण्याकरिता राज्य सरकारने आपल्या वाट्याची १ हजार १६३ कोटी रक्कम एमएमआरडीएला देण्याऐवजी थेट मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. या प्रकल्पाची सुधारित किंमत ३७ हजार २७५ कोटी ५० लाख रुपये असून प्रकल्पाचे ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा सिप्झ ते बीकेसी सप्टेंबरपर्यत आणि डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आहे.

एमएमआऱडीएक़डून एमएमआरसीला मेट्रोकरिता निधी दिला जातो. सरकारी कामाकरिता बराच वेळ लागतो. त्यातच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पाश्र्वभूमीवर मेट्रो- ३ ला आणखी विलंब होऊ नये याकरिता हा िनधी एमएमआरडीएला न देता थेट एमएमआरसीला देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे बोलले जाते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news