IPL 2025 viral video | 'या' खेळाडूला विराटसोबत काढायचा होता फोटो, पण धक्का देऊन कोपऱ्यात ढकललं Video Viral

IPL 2025 Swastik Chikara Virat Kohli viral video RCB vs Punjab Kings | क्वालिफायर 1 सामन्यानंतर RCB संघाच्या फोटोसेशनदरम्यान एक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.
IPL 2025 Swastik Chikara Virat Kohli viral video RCB vs Punjab Kings |
IPL 2025 Swastik Chikara Virat Kohli viral video RCB vs Punjab Kings | file photo
Published on
Updated on

IPL 2025 Swastik Chikara Virat Kohli viral video RCB vs Punjab Kings |

अहमदाबाद : आयपीएलच्या अंतिम सामन्यात अखेर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पंजाब किंग्जला नमवून आयपीएलच्या झळाळत्या चषकावर आपले नाव कोरले. १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिळालेले हे जेतेपद विराटसाठी विशेष आहे. दरम्यान, विराट कोहलीचा क्वालिफायर जिंकल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये, आरसीबीचा एक खेळाडू कोहलीसोबत फोटो काढण्यासाठी धडपडत असतो. पण संघातील दोन खेळाडू त्याला कोपऱ्यात ढकलतात. ते खेळाडू कोण आणि संपूर्ण प्रकरण काय आहे? जाणून घ्या.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा युवा खेळाडू स्वस्तिक चिकारा विराट कोहलीसोबत राहण्याची एकही संधी सोडत नाही. बेंगळुरूस्थित फ्रँचायझीसाठी त्याने अद्याप पदार्पण केलेले नसले तरी, स्वस्तिक आरसीबीसोबतच्या त्याच्या वेळेचा पुरेपूर फायदा घेत आहे. गुरुवारी मुल्लानपूर येथे झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव करून रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखालील संघाने आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्या दिवसाचा चिकाराचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.

IPL 2025 Swastik Chikara Virat Kohli viral video RCB vs Punjab Kings |
IPL 2025 RCB Win: अँडी फ्लॉवर, डीके अण्णा ते प्रभावी गोलंदाज... या पाच कारणांमुळे आरसीबीने कप जिंकला

आरसीबीच्या खेळाडूला कोपऱ्यात का ढकललं?

पंजाब किंग्जविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपूर्ण संघ ग्रुप फोटोसाठी जमला. यासाठी काही खुर्च्याही ठेवल्या होत्या. विराट कोहलीसह काही खेळाडू त्यावर बसले. त्याचवेळी, उर्वरित खेळाडू त्यांच्या मागे रांगेत उभे राहत होते. संघाचा युवा खेळाडू स्वस्तिक चिकारा ग्रुप फोटोसाठी कोहलीच्या अगदी मागे उभा राहतो. पण लियाम लिव्हिंगस्टोन त्याला बाजूला ढकलतो. तो पुन्हा कोहलीच्या मागे उभे राहण्यासाठी येतो. त्यावेळी टिम डेव्हिड त्याला बाजूला ढकलतो. चिकारा कोहलीला आपला आदर्श मानतो. त्यामुळे तो प्रत्येकवेळी कोहलीसोबत राहण्यासाठी धडपडत असतो. यामुळे तो प्रसिद्ध झाला आहे. म्हणूनच ते दोघेही हे मजेत करतात.

कोण आहे स्वस्तिक चिकारा?

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात स्वस्तिक चिकाराला आरसीबीने ३० लाख रुपयांना खरेदी केले. तो या वर्षी आरसीबीचा भाग झाला. आयपीएल २०२५ च्या हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु संपूर्ण हंगामात तो विराट कोहलीसोबत सावलीसारखा फिरताना दिसला. या हंगामात दोघांचेही मौजमजा करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. चाहत्यांना दोघांचेही बॉन्डिंग आवडले आहे.

उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या स्वस्तिक चिकारा याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ६ लिस्ट ए सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने ३३.३३ च्या सरासरीने २०० धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १ शतक आहे. त्याचवेळी, त्याने २ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ७४ धावा आणि ४ टी-२० सामन्यांमध्ये १५ धावा केल्या आहेत. तथापि, चिकारा याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप कमी अनुभव आहे. परंतु तो त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी तो यूपी टी-२० लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. चिकाराने १२ सामन्यांमध्ये ४९.९० च्या सरासरीने आणि १८५ च्या स्ट्राईक रेटने ४९९ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ५ अर्धशतके आणि १ शतक झळकले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news