सूर्यकुमार यादवने सांगितला 'त्या' अफलातून झेलचा लाईव्ह थरार

असे वाटले... चेंडू नाही, ट्रॉफी सीमापार जात आहे
Suryakumar Yadav told the thrill of Miller's catch
सूर्यकुमार टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये मिलरचा झेल घेतानाचा क्षण. file photo

सूर्यकुमार यादव टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये डेव्हिड मिलरच्या मॅच विनिंग कॅचबद्दल बोलला. इंडिया टुडेला दिलेल्या खास मुलाखतीत त्याने हा खुलासा केला.

1. मिलरचा पंड्याच्या पहिल्या फुलटॉस चेंडूवर मोठा फटका

Suryakumar Yadav takes the catch David Miller
सूर्यकुमारने टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये डेव्हिड मिलरचा घेतलेला झेल. file photo

मिलरने हार्दिक पंड्याच्या पहिल्या फुलटॉस चेंडूवर मोठा फटका मारला, हा चेंडू हवेत उंच उडाला आणि सीमारेषेच्या दिशेने गेला. तिथे सूर्यकुमार सीमारेषेच्या जवळ होता. क्षणभर असे वाटत होते की चेंडू सीमारेषा ओलांडून जाईल, पण सूर्यकुमारने अद्भुत कामगिरी केली.

2. अफलातून झेलमुळे टीम इंडियाचा विजय निश्चित

Suryakumar Yadav takes the catch David Miller
सूर्यकुमारने टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये डेव्हिड मिलरचा घेतलेला झेल. file photo

सूर्यकुमारने आधी पाय सीमारेषेला टच होणार नाही याची काळजी घेत झेल घेतला; परंतु तोल जाऊ लागल्याने त्याने चेंडू हवेत उडवला. सूर्यान शिताफीने सीमारेषेच्या आत येताना झेल पुन्हा घेतला, यावेळी त्याने चेंडू हातात येत असताना पाय हवेत राहील याचीही दक्षता घेतली. या अफलातून झेलमुळे टीम इंडियाचा विजय निश्चित झाला.

3. चेंडू पाहून वाटले ट्रॉफी सीमारेषा ओलांडून जात आहे

Suryakumar Yadav takes the catch David Miller
सूर्यकुमारने टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये डेव्हिड मिलरचा घेतलेला झेल. file photo

शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड मिलरने मारलेला फटका जेव्हा माझ्या दिशेने आला तेव्हा मी तो झेल घेण्यासाठी धावलो; परंतु तो माझ्यापासून थोडा लांब आणि उंच होता, सीमारेषेपार हवेतून चाललेला चेंडू पाहून एक क्षण असे वाटले की चेंडू नाही ट्रॉफी सीमारेषा ओलांडून पलीकडे जात आहे, अशा शब्दांत सूर्यकुमार यादवने अफलातून झेलचा लाईव्ह थरार वर्णन केला.

4. त्यावेळेला मला जे शक्य होते ते सर्व केले

Suryakumar Yadav takes the catch David Miller
सूर्यकुमारने टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये डेव्हिड मिलरचा घेतलेला झेल. file photo

सूर्यकुमार झेलबद्दल म्हणाला, आता हे सांगणे सोपे वाटत आहे, पण त्यावेळी असे वाटले की चेंडू नाही ट्रॉफी सीमारेषा ओलांडून पलीकडे जात आहे. त्यावेळेला मला जे शक्य होते ते सर्व केले आणि त्या वेळी वारादेखील मदतीला होता. तसेच, आम्ही आमच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासोबत भरपूर सराव केला आहे आणि असे अनेक झेल यशस्वीपणे टिपले आहेत. त्यामुळे जेव्हा सामन्यात एवढा मोठा क्षण येतो, तेव्हा प्रसंगावधानत आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते.

5. बुमराह आणि अर्शदीप सामना फिरवतील असा विश्वास होता

Suryakumar Yadav takes the catch David Miller
सूर्यकुमारने टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये डेव्हिड मिलरचा घेतलेला झेल. file photo

सूर्यकुमारने असेही सांगितले की, एक क्षण असा आला की जेव्हा त्यांना वाटले की सामना आता त्यांच्यापासून दूर जात आहे. मात्र, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग सामना पुन्हा भारताच्या बाजूने फिरवू शकतात, असा त्याला विश्वास होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news