पुढारी ऑनलाईन डेस्क : संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधलेल्या इंडियन प्रीमियम लीग ( IPL2024 ) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने सामने आहेत. सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सामन्याच्या 19 व्या ओव्हमध्ये रसेलने हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सला मिचेल स्टार्ककरवी झेलबाद करत हैदराबादला 113 धावांवर रोखले. कमिन्सने आपल्या खेळीत 19 बॉलमध्ये 24 धावांची खेळी केली.
सामन्याच्या 15 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर क्लासेनच्या रूपात हैदराबादला आठवा झटका बसला. त्याला कोलकाताचा गोलंदाज हर्षित राणाने क्लीन बोल्ड केले. क्लासेनने आपल्या खेळीत 17 बॉलमध्ये 16 धावांची खेळी केली.
सामन्याच्या 13 व्या ओव्हरमध्ये आंद्रे रसेलने गुरबाजकरवी अद्बुल समदला बाद केले. समदने आपल्या खेळीत 4 बॉलमध्ये 4 धावांची खेळी केली.
मिथुन चर्कवर्तीने शाहबाज अहमदला बाद करत हैदराबादला सहावा झटका दिला. डावाच्या 12 व्या ओव्हरमध्ये चर्कवर्तीने सुनील नरेनकरवी अहमदला झेलबाद केले. अहमदने आपल्या खेळीत 7 बॉलमध्ये 8 धावांची खेळी केली.
डावाच्या 11व्या ओव्हरमध्ये आंद्रे रसेलने मिचेल स्टार्ककरवी एडन मार्करमला बाद करत हैदरबादला पाचवा धक्का दिला. यामुळे एका बाजूने विकेट पडत असताना धावफलक खेळता ठेवणारा मार्करम बाद झाल्याने हैदराबादचा संघ बॅकफुटवर गेला. मार्करमने आपल्या खेळीत 23 बॉलमध्ये 20 धावांची खेळी केली.
नितेश रेड्डीला बाद करत हर्शित राणाने हैदराबादला चौथा धक्का दिला. डावाच्या सातव्या ओव्हरमध्ये राणाने रेड्डीला गुरबाजकरवी झेलबाद केले. नितेश रेड्डीने आपल्या खेळीत 10 बॉलमध्ये 13 धावांची खेळी केली.
सामन्याच्या पाचव्या ओव्हरमध्ये राहूल त्रिपाठीच्या रूपात तिसरा फलंदाज बाद झाला. त्याला कोलकाताचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने रमनदीप सिंगकरवी झेलबाद केले. त्रिपाठीने आपल्या खेळीत 13 बॉलमध्ये 9 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 1 चौकार लगावला. यावेळी त्याने एडन मार्करमसोबत तिसऱ्या विकेटसाठी 14 बॉलमध्ये 15 धावांची खेळी केली.
सामन्यातील दुसऱ्या ओव्हरच्या सहाव्या बॉलवर ट्रॅव्हिस हेडच्या रूपात हैदराबादचा दुसरा फलंदाज बाद झाला. त्याला कोलकाताचा गोलंदाज वैभव अरोराने गुरबाजकरवी झेलबाद केले. विस्फोटक फलंदाज हेडला आपल्या खेळीत भोपळाही फोडता आला नाही. डावाच्या पहिल्याच बॉलवर तो बाद झाला.
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादची सुरूवात खरबा झाली. डावाच्या पहिल्याच ओव्हरच्यया पाचव्या बॉलवर मिचेल स्टार्कने अभिषेक शर्माला क्लीन बोल्ड करत हैदराबादला पहिला झटका दिला. अभिषेक शर्माला आपल्या खेळीत 5 बॉलमध्ये केवळ 2 धावांची खेळी करता आली.
अंतिम सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्यात अब्दुल समदच्या जागी शाहबाज अहमदला संधी स्थान दिल्याचे हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने सांगितले. तर कोलकाताने अंतिम सामन्यासाठी संघात कोणताही बदल केलेला नाही.
कोलकाता नाइट रायडर्स : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट प्लेयर : अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफेन रदरफोर्ड.
सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.
इम्पॅक्ट प्लेयर : उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर.