कामिंदू मेंडिस ठरला 'आयसीसी इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर'! जाणून घ्या आकडेवारी

Kamindu Mendis : 2024 मध्ये ठोकली 5 शतके, 5 अर्धशतके
kamindu mendis icc mens emerging cricketer of the year 2024
कमिंदू मेंडिसTwitter
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसीने विविध श्रेणींमधील पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंची रविवारी (दि. 26) नावेही जाहीर केली. यात श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज कामिंदू मेंडिसने (Kamindu Mendis) मोठ्या पुरस्कारावर मोहोर उमटवली. तो 2024 मधील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख पुरुष क्रिकेटपटू (इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर) ठरला आहे. (kamindu mendis icc mens emerging cricketer of the year 2024)

कामिंदू मेंडिसने (Kamindu Mendis) 2024 मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये धमाकेदार कामगिरी केली. तो विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये प्रभावी ठरला. त्याने नऊ कसोटी सामन्यांमध्ये 74.92 च्या सरासरीने 1049 धावा केल्या. यादरम्यान त्याने पाच शतके आणि तीन अर्धशतके झळकावली. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 52.00 च्या सरासरीने 104 धावा आणि टी-20 मध्ये 2 अर्धशतकांच्या मदतीने 305 धावा केल्या.

मेडिसने (Kamindu Mendis) गेल्या वर्षी सर्व फॉरमॅटमध्ये 34 सामने खेळले आणि 47.03 च्या सरासरीने 1458 धावा केल्या. त्याने पाकिस्तानचा साईम अयुब, वेस्ट इंडिजचा शमार जोसेफ आणि इंग्लंडचा गस एटकिन्सन यांना मागे टाकत 'इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर' हा पुरस्कार जिंकला.

श्रीलंकेच्या या डावखुऱ्या फलंदाजाने 2024 पूर्वी श्रीलंकेसाठी फक्त एकच कसोटी खेळली होती. पण गेल्या 12 महिन्यांत त्याने असा खेळ केला की तो या फॉरमॅटमध्ये श्रीलंकेसाठी एक महत्त्वाचा खेळाडू बनला. त्याच्यामुळेच श्रीलंकेने न्यूझीलंड, बांगलादेश आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी सामने जिंकले. इंग्लंड दौऱ्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो श्रीलंकेसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याच्यामुळेच श्रीलंकेने दशकानंतर इंग्लिश भूमीवर कसोटी सामना जिंकला. या काळात, मेंडिस कसोटीत सर्वात जलद 1000 धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला. त्याने फक्त 13 डावांमध्ये 1000 कसोटी धावा पूर्ण करून आणि ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी केली.

मेंडिसने 2024 मध्येच त्याची सर्वोच्च कसोटी धावसंख्या नोंदवली. त्याने न्यूझीलंडविरुद्ध गॅले कसोटीत नाबाद 182 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने 250 चेंडूंचा सामना केला. या डावात त्याने 16 चौकार आणि 4 षटकार ठोकले. यासह, श्रीलंकेने पाच विकेटच्या मोबदल्यात 602 धावा केल्या आणि मालिका 2-0 अशी जिंकली. गॅले कसोटीत मेंडिसला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.

गेरहार्ड इरास्मस ठरला ICC असोसिएट प्लेअर ऑफ द इयर

नामिबियाचा गेरहार्ड इरास्मस आयसीसी पुरुष असोसिएट प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार जिंकण्यात यशस्वी झाला. इरास्मस हा अष्टपैलू खेळाडू आहे. 2024 मध्ये त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली. त्याने 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये 33.09 च्या सरासरीने 364 धावा केल्या आणि 22.38 च्या सरासरीने 18 विकेट्स घेतल्या. त्याच वेळी, त्याने 13 टी-20 सामन्यांमध्ये 33.00 च्या सरासरीने 363 धावा केल्या आणि गोलंदाजीत 18 विकेट्सही घेतल्या. इरास्मसने गेल्या वर्षीही हा पुरस्कार जिंकला होता. यासह हा नामिबियन खेळाडू एकापेक्षा जास्त वेळा आयसीसी पुरुष असोसिएट प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारा जगातील दुसरा खेळाडू बनला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news