पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने ठेवलेल्या १७४ धावांच्या लक्षाचा दुबळ्या श्रीलंकेने मोठ्या धैर्याने यशस्वी पाठलाग केला. श्रीलंकेने ६ गडी राखत भारतावर मोठा विजय नोंदवला. या विजयाने आता भारताचे आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. श्रीलंकेच्या सलामीवीरांने दिलेली ९७ धावांची भागिदारी, सलामीवीर निसांकाच्या ५२ धावा, मेडिंसच्या ५७ धावा आणि अखेरीस धनुष शनाका आणि राजेपाक्षे यांच्या खेळीने भारताकडून विजयाच घास श्रीलंकेने हिरावून घेतला. (Asia Cup IND vs SL)
अखेरच्या दोन षटकात श्रीलंकेला १२ चेंडू २१ धावांची आवश्यता होती. भूवनेश्वर कुमार याने १९ व्या षटकात तब्बल १४ धावा दिल्या. या षटकात त्याने दोन वाईड चेंडू टाकले व श्रीलंकेच्या फलंदाजांनी २ चौकार लगावले. यामुळे अखेरच्या षटकात ६ चेंडूत ७ धावांची आवश्यकता होती. मागील सामन्यातील विलन ठरलेल्या अश्रदीप सिंगकडे रोहित शर्माने चेंडू सोपवला. अश्रदीपने शेवटचे षटक अत्यंत अचूक टाकले. त्याच्या पहिल्या, दुसऱ्या चेंडूवर १ – १ धावा आणि तिसऱ्या चेंडूवर २ धावा श्रीलंकेने घेतल्या. यानंतर ३ चेंडूत ३ धावांची आवश्यकता होती. ४ थ्या चेंडूवर पुन्हा १ धावा श्रीलंकेने घेतली. पुढे पाचव्या चेंडूवर श्रीलंकेच्या फलंदाजाने चेंडू वाया घालवला. तो चेंडू यष्टीरक्षक पंतकडे गेला. श्रीलंकेचे फलंदाज धावले. पंतने थ्रो विकेटवर मारला पण, तो चेंडू चुकला व अश्रदीपच्या हातात गेला. अश्रदीपने चेंडू पुन्हा दुसऱ्या विकेटवर फेकला. या ओव्हर थ्रोमुळे श्रीलंकेचे फलंदाजांनी २ धावा घेतल्या व भारताला पराभूत केले. (Asia Cup IND vs SL)
श्रीलंकेच्या निसंका आणि कुशल मेंडिस या सलामीवीर यांनी अनुक्रमे ५२ व ५७ धावा केल्या. तसेच भानुका राजेपाक्षे याने १७ चेंडूत २५ धावा व दासुन शनाका याने १८ चेंडूत ३३ धावांची अखेरच्या क्षणी केलेली खेळी भारतासाठी घात ठरली. (Asia Cup IND vs SL)
भारताच्या गोलंदाजी या सामन्यात देखील पुर्णपणे अपयशी ठरली. १२ ते १५ षटकात फिरकी गोलंदाजांनी ४ बळी घेत सामन्यात घेण्याच्या आशा पल्लवीत केल्या पण पुन्हा जलद गोलंदाजीमुळे हातातील सामन्यात गमवावा लागला. भूवनेश्वर कुमार अपयशी ठरला व त्याने अधिक धावा दिल्या. त्याने ४ षटकात ३० धावा दिल्या व त्याला कोणताही बळी मिळवता आला नाही. अश्रदीपने ३.५ षटकात ४० धावा दिल्या त्याला सुद्धा बळी मिळवता आला नाही. यांच्या सोबत हार्दीक पंड्याने देखिल ४ षटकात ३५ धावा दिल्या व तो सुद्धा बळी घेण्यात अपयशी ठरला. फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याने ४ षटकात ३४ धावा देत ३ बळी घेतले तर अश्वीनने ४ षटकात ३२ धावा देत १ बळी मिळवण्यात यश मिळवले.
Live Update : (Asia Cup IND vs SL)
भारताने गोलंदाजीच्या जीवावर पुन्हा एकदा सामन्यात पुनरागमन केले आहे. भारताने तीन षटकात श्रीलंकेचे महत्त्वाचे ४ विकेट्स टीपले आहेत. युजवेंद्र चहलने १२ व्या षटकात दोन, १४ षटकात रवींद्रन अश्वीन याने १ आणि पुन्हा युजवेंद्र चहल याने १५ व्या षटकात १ बळी घेऊन श्रीलंकेवर दबाव निर्माण केला आहे. सलामीवीर व खेळपट्टीवर जम बसलेली जोडी आता तंबुत परतली आहे. (Asia Cup IND vs SL)
भारताने दिलेल्या १७४ धावांच्या आव्हानचा पाठलाग करण्यास उतरलेल्या श्रीलंकेने भारताला तोडीस तोड प्रतित्युर दिले आहे. श्रीलंकेच्या सलामी जोडीने ९७ धावांची भागिदारी दिली. दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीवर दबाव राखून ठेवला. अखेर अनेक प्रयत्नांनी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याने १३ षटकात तीन बळी घेत भारताला पुन्हा सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली आहे.श्रीलंकेने १३.३ षटकाअखेर ३ बाद ११० धावा जोडल्या आहेत. तर त्यांना विजयासाठी ३९ चेंडूत ६४ धावांची आवश्यकता आहे.
आशिया चषक स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यात सुपर-4 सामना खेळला जात आहे. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. टीम इंडियाने 20 षटकांत 7 विकेट गमावून 173 धावा केल्या. भारतीय संघासाठी रोहित शर्माच्या बॅटने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 41 चेंडूत 72 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी सूर्यकुमार यादवनेही 34 धावा केल्या. रोहितचे टी-20 कारकिर्दीतील 28 वे अर्धशतक होते. त्याच वेळी, श्रीलंकेकडून डावखुरा वेगवान गोलंदाज मदुशंका, उजव्या हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज करुणारत्ने आणि कर्णधार दासुन शनाका यांनी घातक गोलंदाजी केली. मधुशंकाने तीन आणि करुणारत्ने-शनाकाने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
श्रीलंकेच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. रवी बिश्नोईच्या जागी रविचंद्रन अश्विनला संधी देण्यात आली आहे. भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताला सलग दोन षटकांत (2 रे आणि 3 रे) दोन धक्के बसले. केएल राहुलनंतर फॉर्मात असलेला विराट कोहली खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला दिलशान मधुशंकाने क्लीन बोल्ड केले.
यानंतर 13व्या षटकात भारताला 110 धावांवर तिसरा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा सुरेख खेळी करून बाद झाला. त्याने 41 चेंडूत 72 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि चार षटकार मारले. सूर्यकुमारसह रोहितने भारताला संकटातून बाहेर काढले. एका क्षणी भारताने 13 धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर रोहित आणि सूर्यकुमार यांनी तिसऱ्या विकेटसाठी 58 चेंडूत 97 धावांची भागीदारी केली. 13 षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 112 अशी होती.
भारताला 15व्या षटकात 119 धावांवर चौथा धक्का बसला. कर्णधार दासुन शनाकाने सूर्यकुमार यादवला महेश तेक्षाकरवी झेलबाद केले. सूर्यकुमारला 29 चेंडूत 34 धावा करता आल्या. 15 षटकांनंतर भारताची धावसंख्या 4 बाद 127 होती.
18व्या षटकात 149 धावांवर भारताला पाचवा धक्का बसला. हार्दिक पांड्या 13 चेंडूत 17 धावा काढून बाद झाला. त्याला श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने निसांकाच्या हाती झेलबाद केले. 18 षटकांनंतर भारताची धावसंख्या 5 बाद 157 होती.
मधुशंकाने घातक गोलंदाजीचे प्रदर्शन करत भारताला 19व्या षटकात दोन धक्के दिले. त्याने दीपक हुडा आणि ऋषभ पंतला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हुडा तीन धावा करून बाद झाला तर पंतने 17 धावा केल्या. 19 षटकांनंतर भारताची धावसंख्या 7 बाद 161 होती.
10 षटकांनंतर भारताने 2 गडी गमावून 79 धावा केल्या. रोहित शर्मा 32 चेंडूत 52 फटकावत अर्धशतक फटकावले. रोहितने 32 चेंडूत टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 28 वे अर्धशतक झळकावले. तत्पूर्वी, भारतीय संघाला पहिल्या दोन षटकांत दोन धक्के बसले. राहुल सहा धावा आणि कोहली खाते न उघडता बाद झाला. महेश तेक्षाना आणि मधुशंका यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
भारताने 8व्या षटकातील पहिल्या चेंडूवर 50 धावा पूर्ण केल्या. कर्णधार रोहित शर्मा चांगल्या लयीत दिसत असून सूर्यकुमार यादव त्याच्यासोबत क्रीजवर उपस्थित आहे. 8 षटकांत भारताची धावसंख्या 2 बाद 54 होती.
4 षटकात 22 धावांची संथ सुरुवात केल्यानंतर, रोहित शर्माने 5 व्या षटकात असिथा फर्नांडोविरुद्ध वेग पकडला. या षटकात त्याने एक षटकार आणि एक चौकार लगावला. या षटकात भारताच्या खात्यात 14 धावा आल्या. 5 षटकांनंतर भारताची धावसंख्या 2 विकेटवर 36 धावा होती. पॉवरप्लेच्या पहिल्या चार षटकांमध्ये केएल राहुल आणि विराट कोहलीच्या रूपाने भारताने दोन मोठ्या विकेट गमावल्या. त्यानंतर रोहितने आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले.
भारताला दुसरा धक्का तिसऱ्या षटकात 13 धावांवर बसला. दिलशान मदुशंकाने विराट कोहलीला क्लीन बोल्ड केले. कोहलीने चार चेंडू खेळले. कोहली पहिल्यांदाच या स्पर्धेत विशेष काही करू शकला नाही. यापूर्वी त्याने दोन अर्धशतके झळकावली होती. त्याचवेळी त्याने पाकिस्तानविरुद्धच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात 35 धावा केल्या होत्या.
भारताला पहिला धक्का दुसऱ्या षटकात 11 धावांवर बसला. केएल राहुल पुन्हा फ्लॉप झाला. तो सात चेंडूंत सहा धावा करून महेश तेक्षानाने पायचीत केले. राहुलने या स्पर्धेत आतापर्यंत खराब फलंदाजी केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात राहुलला खातेही उघडता आले नव्हते. त्याचवेळी हाँगकाँगविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याला 39 चेंडूत 36 धावा करता आल्या. पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात राहुलला 20 चेंडूत 28 धावा करता आल्या. त्याचवेळी त्याला या सामन्यात सहा धावा करता आल्या.
भारतासाठी हा सामना 'करो या मरो' असाच आहे. टीम इंडियाने सुपर-4 फेरीतील पहिला सामना गमावला आहे. त्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. श्रीलंकेविरुद्धचा सामना हरल्यास भारतीय संघ आशिया कपमधून बाहेर पडेल. त्याचवेळी श्रीलंकेने सुपर-4 फेरीतील पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध जिंकला आहे. त्यामुळे त्यांनी हा सामना जिंकल्यास संघाचा अंतिम फेरीतील मार्ग सुकर होईल. मात्र, पराभव झाला तरी श्रीलंकेला आणखी एक संधी मिळेल. श्रीलंकेचा पाकिस्तानविरुद्धचा सामना अजून खेळायचा आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.
पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चारिथ अस्लंका, दानुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासून शानाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश तिक्षा, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका.