Gary Kirsten Sri Lanka : गॅरी कर्स्टन श्रीलंकेचे नवे मुख्य प्रशिक्षक

Gary Kirsten appointment : मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ 15 एप्रिलपासून सुरू होणार
Gary Kirsten Sri Lanka coach
Published on
Updated on

कोलंबो : भारताला 2011 मध्ये विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज क्रिकेटपटू आणि ख्यातनाम प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आता श्रीलंका क्रिकेट संघाची धुरा सांभाळणार आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कर्स्टन यांची राष्ट्रीय पुरुषांच्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली असून, त्यांचा कार्यकाळ 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे.

गॅरी कर्स्टन यांची ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे होणाऱ्या 2027 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी श्रीलंकेचा संघ तयार करणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे ही त्यांची मुख्य जबाबदारी असेल.

खेळाडू म्हणूनही दबदबा

प्रशिक्षक बनण्यापूर्वी कर्स्टन हे दक्षिण आफ्रिकेचे स्टार फलंदाज होते. 1993 ते 2004 या काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 हजारपेक्षा अधिक धावा कुटल्या आहेत. त्यांच्या नावावर 21 कसोटी शतके आणि 13 वन डे शतकांची नोंद आहे.

प्रशिक्षक नात्याने गौरवशाली कारकीर्द

कर्स्टन यांची प्रशिक्षक म्हणून कारकीर्द गौरवशाली राहिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने 2011 चा ऐतिहासिक आयसीसी विश्वचषक उंचावला होता. त्यानंतर 2011 ते 2013 या काळात त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रशिक्षण दिले. त्यांच्याच कार्यकाळात 2013 मध्ये ‌‘प्रोटियाज‌’ संघाने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात नामिबिया संघासाठी सल्लागार म्हणून काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news