Spain Vs Belgium | स्‍पेनचा जोश की बेल्‍जियमचा अनुभव?

Spain Vs Belgium |
Spain Vs Belgium | स्‍पेनचा जोश की बेल्‍जियमचा अनुभव?
Published on
Updated on

लॉस एंजेलिस; वृत्तसंस्‍था : स्पेन आणि बेल्जियम हे फुटबॉल जगतातील दोन बलाढ्य संघ आज फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने येत आहेत. लॉस एंजेलिसच्या मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १२.३० वाजता या लढतीला सुरुवात होईल. दोन्ही संघांनी अद्याप स्पर्धेत अपराजित राहून ही मजल मारल्याने हा सामना अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

स्पेनच्या (ला रोझा) संघाने यंदा जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यांनी बाद फेरीत ऑस्ट्रियाचा ३-० असा धुव्वा उडवला, तर पोर्तुगालविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात मिकेल मेरिनोने शेवटच्या क्षणी गोल करून संघाला विजय मिळवून दिला. रॉड्री, पेड्री आणि डॅनी ओल्मो या मिडफिल्डर्ससह युवा स्टार लॅमिन यमाल याच्यावर स्पेनच्या आक्रमणाची धुरा असेल.

दुसरीकडे, बेल्जियमचा (रेड डेव्हिल्स) बाद फेरीतील प्रवास थरारक राहिला. सेनेगलविरुद्ध ०-२ ने पिछाडीवर असताना त्यांनी ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवला. त्यानंतर यजमान अमेरिकेला ४-१ ने पराभूत करत त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले. बेल्जियमसाठी ही स्पर्धा त्यांच्या ‘गोल्डन जनरेशन’ची शेवटची संधी मानली जात आहे. अनुभवी केविन डी ब्रुएन, गोलरक्षक थिबॉत कोर्टुआ आणि स्टार फॉरवर्ड रोमेलु लुकाकू यांच्यावर संघाची मदार आहे. लुकाकूने या स्पर्धेत तीन गोल करत ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि दिएगो मॅराडोना यांच्या ८ विश्वचषक गोल्सच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

इतिहासात समसमान कौल

इतिहास पाहिला तर विश्वचषकात दोन्ही संघ दोनदा भिडले असून, दोघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. १९८६ च्या उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमने स्पेनला पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ असे हरवले होते, तर १९९० मध्ये स्पेनने २-१ ने विजय मिळवत बदला घेतला होता. आता लॉस एंजेलिसमध्ये कोणता संघ इतिहास रचणार, याकडे फुटबॉल वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news