

नवी दिल्ली : एकदा फलंदाजीला स्थिरावल्यानंतर विराट कोहलीसारख्या जागतिक दर्जाच्या फलंदाजांना रोखणे जवळपास अशŠय होते, अशी प्रांजळ कबुली दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मार्को यान्सेनने दिली. कोहलीची मोठी खेळी करण्याची क्षमता निर्विवाद असून, त्याला सामोरे जाणे कोणत्याही गोलंदाजासाठी आव्हानात्मक असते, असे तो याप्रसंगी म्हणाला. त्याला गोलंदाजी करण्यासाठी सर्वात कठीण प्रतिस्पर्धकांपैकी एक बनवते, असेही यान्सेनने मान्य केले.
पहिल्या वन-डे सामन्यात विराट कोहलीच्या मॅच विनिंग खेळीमुळे भारताने बाजी मारली. या पार्श्वभूमीवर यान्सेन बोलत होता. विराटसारख्या जागतिक दर्जाच्या फलंदाजाला बाद करण्याची एकमेव खरी संधी त्याच्या पहिल्या काही चेंडूंमध्येच असते. मात्र, आम्हाला पहिल्या वन-डेत हे साध्य झाले नाही. जेव्हा तुम्ही जागतिक दर्जाच्या खेळाडूंना गोलंदाजी करता, तेव्हा त्यांना बाद करणे खूप कठीण असते. फलंदाज जेव्हा खेळपट्टीशी जुळवून घेत असतो, त्याच पहिल्या 10 किंवा 15 चेंडूंमध्ये त्याला बाद करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. विराटविरुद्ध मात्र ही रणनीती सफल झाली नाही, असे त्याने पुढे नमूद केले.
उभय संघांत उद्या रंगणार दुसरी वन-डे : भारत-द. आफ्रिका यांच्यातील दुसरी वन-डे उद्या बुधवार, दि. 3 रोजी रायपूर येथे खेळवली जाणार आहे.
120 चेंडू / 135 धावा
प्रोडक्टिव्ह शॉट : फ्लिक
त्यावरील धावा : 29
फटक्यांवरील नियंत्रण : 90 टक्के