

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या आयर्लंड महिला संघ भारतीय दौऱ्यावर आहे. आज (दि.15) राजकोट येथे सुरु असलेल्या सामन्यामध्ये भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करत अनेक विक्रम आपल्या नावे केले. स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांच्या शतकांमुळे भारतीय महिला संघाने एकदिवसीय इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. राजकोटमध्ये आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 50 षटकांत 5 गडी गमावून 435 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमधील भारतीय महिला संघाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजी मैदानात उतरली. भारताकडून मानधना आणि प्रतीका सलामीला आल्या. मानधनाने धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन करत ७० चेंडूत शतक झळकावले. तिने १२ चौकार आणि सात षटकार फटकावत ८० चेंडूत १३५ धावांची खेळी केली. तर सलामीवीर प्रतिका रावलनेही धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन केले. तिने 129 चेंडूत 20 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने 154 धावांची खेळी केली. शतक झळकावल्यानंतर स्मृती मानधनाच्या बाद होण्याच्या स्वरूपात भारताला सुरुवातीलाच धक्का बसला.
ओर्ला प्रेंडरगास्टने मंधानाला बाद करून संघाला यश मिळवून दिले. 80 चेंडूत 12 चौकार आणि सात षटकारांसह 135 धावा काढल्यानंतर मानधना बाद झाली. यासोबतच, मानधना आणि प्रतिका रावल यांच्यातील पहिल्या विकेटसाठी 233 धावांची भागीदारी संपुष्टात आली. भारताकडून मानधना आणि प्रतीका व्यतिरिक्त, यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोषने 42 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 59 धावा केल्या आहेत. याशिवाय तेजल हसबनीसने २८ आणि हरलीन देओलने १५ धावा केल्या. दीप्ती शर्मा ११ आणि जेमिमा रॉड्रिग्ज चार धावांवर नाबाद राहिली. आयर्लंडकडून ओर्ला प्रेंडरगास्टने दोन, तर अर्लीन केली, फ्रेया सार्जेंट आणि जॉर्जिना डेम्पसीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
यापूर्वी, संघाने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 5 विकेटच्या मोबदल्यात 370 धावा केल्या होत्या. जो भारतीय संघाचा सर्वोच्च धावसंख्या होता, परंतु पुढच्याच सामन्यात संघाने हा विक्रम मागे टाकला. मानधना आणि प्रतीकाने भारताला चांगली सुरुवात करून दिली आणि दोघांनीही शतके ठोकली. प्रतीकाचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक आहे. यापूर्वी अनुभवी फलंदाज स्मृती मानधनानेही शतक झळकावले.
तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजी मैदानात उतरली. भारताकडून मानधना आणि प्रतीका सलामीला आल्या. मानधनाने धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन करत ७० चेंडूत शतक झळकावले. तिने १२ चौकार आणि सात षटकार फटकावत ८० चेंडूत १३५ धावांची खेळी केली. तर सलामीवीर प्रतिका रावलनेही धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन केले. तिने 129 चेंडूत 20 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने 154 धावांची खेळी केली.
न्युझीलंड महिला संघाने 8 जानेवारी 2018 रोजी आर्यंलड विरुद्धच्या सामन्यात 50 षटकांत 491 धावा केल्या होत्या. आजवरच्या महिला वनडे क्रिकेटमधील ही उच्चांकी धावसंख्यां आहे. विशेष, या प्रकारातील अनुक्रमे चारही विक्रम 455, 440, 418 हे न्युझीलंड महिला संघाच्या नावासमोर आहे. तसेच महिलांच्या वनडेमध्ये 400 धावा करणारा भारतीय संघ तिसरा ठरला आहे. याआधी केवळ न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाने अशी कामगिरी केली आहे.