

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) आज (दि.१५) इतिहास रचला. भारत आणि आयर्लंड यांच्यातील राजकोटमध्ये झालेल्या वन-डे सामन्यात तिने धमाकेदार शतक झळकावले. या खेळीने मानधनाने सर्वात जलद वनडे शतकाचा विक्रम मोडला आहे. त्याने केवळ ७० चेंडूत आपली शतकी खेळू पूर्ण केली.
भारत आणि आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजी मैदानात उतरली. भारताकडून मानधना आणि प्रतीका सलामीला आल्या. मानधनाने धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन करत ७० चेंडूत शतक झळकावले. तिने १२ चौकार आणि सात षटकार फटकावत ८० चेंडूत १३५ धावांची खेळी केली. तर सलामीवीर प्रतिका रावलनेही धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन केले. तिने 129 चेंडूत 20 चौकार आणि १ षटकाराच्या सहाय्याने 154 धावांची खेळी केली. असे हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
भारताकडून फलंदाजी करताना मानधनाने सर्वात जलद एकदिवसीय शतकाचा विक्रम मोडला. त्याने फक्त ७० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तिने हरमनप्रीत कौरचा विक्रम मोडित काढला. २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौरने ८७ चेंडूत शतक झळकावले होते. हरमनप्रीतने यापूर्वी २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९० चेंडूत शतक झळकावले होते.
७० - स्मृती मानधना (२०२५)
८७ - हरमनप्रीत कौर (२०२४)
९० - हरमनप्रीत कौर (२०१७)
९० - जेमिमा रॉड्रिग्ज (२०२५)
९८ - हरलीन देओल (२०२४)