Smriti Mandhana Record Break Batting : ६६ चेंडूंत ८० धावा.. ३ विश्वविक्रम! स्मृती मानधनाने केली कांगारू गोलंदाजांची धुलाई

६६ चेंडूंत ८० धावा.. ३ विश्वविक्रम! स्मृती मानधनाने केली कांगारू गोलंदाजांची धुलाई
Smriti Mandhana Record Break Batting : ६६ चेंडूंत ८० धावा.. ३ विश्वविक्रम! स्मृती मानधनाने केली कांगारू गोलंदाजांची धुलाई
Published on
Updated on

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धमाकेदार प्रदर्शन केले. तिने ८० धावांची शानदार खेळी साकारून विक्रमांची मालिकाच रचली. या डावखुऱ्या फलंदाजाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५,००० धावांचा टप्पा पूर्ण केला असून, या विक्रमाला गवसणी घालणारी ती जगातील पाचवी आणि भारताची दुसरी फलंदाज ठरली आहे.

सध्या विशाखापट्टणम येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला विश्वचषकाचा १३वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार ऍलिसा हिलीने टॉस जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे.

५,००० एकदिवसीय धावा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनी भारताला अतिशय दमदार सुरुवात करून दिली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या दरम्यान, मानधनाने ४६ चेंडूंमध्ये, तर प्रतीकाने ६९ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.

आपल्या ३३व्या एकदिवसीय अर्धशतकासह मानधनाने अनेक नवे विक्रम रचले. ती एका कॅलेंडर वर्षात १,००० धावा पूर्ण करणारी पहिली महिला फलंदाज बनली. त्यानंतर तिने एकदिवसीय क्रिकेटमधील ५,००० धावांचा टप्पाही पार केला. ही कामगिरी करणारी ती जगातील पाचवी आणि भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली. यापूर्वी, माजी भारतीय कर्णधार मिताली राज हिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५,००० हून अधिक धावा केल्या आहेत.

स्मृती मानधनाने या एकाच सामन्यात एकाच वेळी दोन विश्वविक्रम स्थापित करत महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे.

मानधना केवळ सर्वात जलद ५,००० धावा करणारी फलंदाज ठरली नाही, तर ती सर्वात कमी वयात हा टप्पा गाठणारी खेळाडू देखील बनली आहे.

विक्रमांचे तपशील:

मानधनाने ज्या क्षणी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५८वी धाव घेतली, त्याच क्षणी तिने सर्वात जलद आणि सर्वात कमी वयात महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५,००० धावा पूर्ण केल्या.

  • सर्वात जलद ५,००० धावा (डावानुसार): तिने ११२व्या डावात ही कामगिरी केली. (यापूर्वी वेस्ट इंडिजच्या स्टीफनी टेलरने १२९ डावांमध्ये हा विक्रम केला होता.)

  • सर्वात जलद ५,००० धावा (चेंडूंनुसार) : तिने ५,५६९ चेंडूंचा सामना करत ५,००० धावा पूर्ण केल्या. (यापूर्वी न्यूझीलंडच्या सुझी बेट्सने ६,१८२ चेंडूंमध्ये हा विक्रम केला होता.)

  • सर्वात कमी वयात ५,००० धावा : मानधनाने २९ वर्षे आणि ८६ दिवसांचे वय असताना हा विक्रम रचला आहे.

मानधनाने या सामन्यात ६६ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांच्या मदतीने ८० धावांची झंझावाती खेळी केली. यावेळी तिचा स्ट्राइक रेट १२१.२१ होता. तिने भारताला या महत्त्वाच्या सामन्यात धमाकेदार सुरुवात करून दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news