Smriti Mandhana : स्मृती मानधनाचा करिष्मा! ICC क्रमवारीत मोठी झेप

Smriti Mandhana : स्मृती मानधनाचा करिष्मा! ICC क्रमवारीत मोठी झेप
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि स्टार खेळाडू स्मृती मानधना हिने आणखी एक नवा टप्पा गाठला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात स्मृतीने शानदार शतक झळकावले आणि आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या कामगिरीसह तिने आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत दोन स्थानांनी मोठी झेप घेत टॉप 3 मध्ये समावेश केला आहे.

आयसीसीने आज महिला खेळाडूंची एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली. यामध्ये इंग्लंडची फलंदाज सायव्हर-ब्रंट पहिल्या स्थानावर पोहोचण्यात यशस्वी ठरली आहे. याआधी ती दुसऱ्या क्रमांकावर होती, मात्र आता तिने एका स्थानाची प्रगती करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिचे रेटिंग सध्या 772 आहे. याआधी पहिल्या क्रमांकावर असलेली श्रीलंकेली फलंदाज चामारी अटापट्टू आता दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. भारताच्या स्मृती मानधनाने दोन स्थानांनी झेप घेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. तिचे रेटिंग सध्या 715 आहे. याआधीही ती पहिल्या क्रमांकावर होती, पण खराब कामगिरीची फटका बसल्याने तिच्या क्रमवारीत घरण झाली होती.

टी-20 क्रमवारीत अव्वल 5 मध्ये

इतकंच नाही तर स्मृती मानधनाने आयसीसी टी-20 क्रमवारीत टॉप 5 मध्ये एन्ट्री घेतली आहे. यादरम्यान तिचे रेटींग 715 आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात स्मृती मानधनाने 127 चेंडूंचा सामना करत 117 धावा केल्या. या सामन्यात तिने एक षटकार आणि 12 चौकार लगावले.

द. आफ्रिकेविरुद्धचे दोन सामने बाकी

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 50 षटकात 8 गडी गमावून 265 धावा केल्या. द. आफ्रिकेला विजयासाठी 266 धावा करायच्या होत्या. परंतु त्यांचा संपूर्ण संघ 37.4 षटकांतच केवळ 122 धावांतच गारद झाला. यासह भारताने हा सामना 143 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. या मालिकेत दोन सामने बाकी आहेत, त्यात स्मृती मानधनाच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news