ISSF World Cup 2025 | सिमरनप्रीतला २५ मीटर पिस्तूलमध्ये रौप्य; मनू भाकरचे पदक हुकले

Simranpreet Kaur | पहिले वरिष्ठ आंतरराष्ट्रीय पदक
ISSF World Cup 2025 | Simranpreet Kaur
ISSF World Cup 2025 | ISSF विश्वचषक : सिमरनप्रीतला रौप्यपदक; मनू भाकरचे पदक हुकलेfile photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पेरूच्या लिमा येथे सुरू असलेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाज सिमरनप्रीत कौर ब्रारने (Simranpreet Kaur) महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक जिंकून तिचे पहिले वरिष्ठ आंतरराष्ट्रीय पदक जिंकले. तर पॅरिस ऑलिंपिकमध्ये दुहेरी पदक विजेती मनू भाकर चौथ्या स्थानावर राहिल्याने तिचे या स्पर्धेतील पदक हुकले.

भारताच्या २० वर्षीय सिमरनप्रीतने (Simranpreet Kaur) १० रॅपिड फायर मालिकेत ३३ हिट्स मारले, मात्र ती चीनच्या सुन युजीपेक्षा फक्त एक शॉट मागे राहिली. या स्पर्धेत सुन युजीने सलग दुसरे विश्वचषक सुवर्ण पदक जिंकले. आणखी एका चिनी नेमबाज याओ कियानशूनने २९ हिट्ससह कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत भारताचे हे चौथे रौप्यपदक आहे. याशिवाय भारताने दोन सुवर्ण आणि एक कांस्यपदकही जिंकले आहे.

मनू भाकर पदक हुकली

पहिल्या मालिकेनंतर चिनच्या खेळाडूंनी अव्वल स्थान मिळवले. भारतीय नेमबाजांनी दुसऱ्या मालिकेतून यशाची वाटचाल सुरू केली. सहाव्या मालिकेत मनू आणि सिमरनप्रीतने प्रत्येकी पाच शॉट्स मारले, तर ईशाने चार लक्ष्ये भेदली. यानंतर, मनू, ईशा आणि जर्मनीच्या डोरीन व्हेनेकॅम्प यांच्यात शूट-ऑफ झाला. ईशा ही पहिलीच बाहेर पडली. त्यानंतर मनूने दुसऱ्या शूट-ऑफमध्ये डोरेनला हरवून चौथे स्थान मिळवले. पुढच्या मालिकेनंतर मनू एका गुणाने मागे राहिल्याने बाहेर पडली. तत्पूर्वी, मनू, ईशा आणि सिमरनप्रीतने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. पात्रता फेरीत मनूने ५८५ गुणांसह दुसरे स्थान पटकावले तर सिमरनप्रीतने ५८० गुणांसह पाचवे स्थान पटकावले. ईशाने ५७५ गुण मिळवत आठवे आणि अंतिम पात्रता स्थान निश्चित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news