Shreyas Iyer Reord in IPL Final : श्रेयस अय्यरने टॉस जिंकताच नोंदवला ऐतिहासिक विक्रम

RCB vs PBKS : आयपीएल 2025 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे, ज्यामध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासह तो एका खास विक्रमाचा भाग बनला.
Ipl 2025 rcb vs pbks final ahmedabad
Published on
Updated on

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामाचा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या विजेतेपदाच्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याचा निकाल काहीही असो, आयपीएल ट्रॉफी जिंकणारा संघ पहिल्यांदाच विजेतेपद जिंकण्यात यशस्वी होईल हे निश्चित. त्याच वेळी, अय्यर अंतिम सामन्यात टॉस जिंकून एका विक्रमाचा भाग बनला, जो यापूर्वी एकाच आयपीएल हंगामात फक्त तीन वेळा घडला होता.

अय्यरने जिंकले 12 सामन्यांचे टॉस

या हंगामात खेळल्या गेलेल्या एकूण 17 सामन्यांपैकी 12 सामन्यांमध्ये पंजाब किंग्ज संघाने टॉस जिंकले. यासह, पंजाब किंग्ज संघ एका हंगामात सर्वाधिक टॉस जिंकण्याच्या बाबतीत एका विशेष यादीचा भाग बनला. पंजाब किंग्ज संघाने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंतच्या एका हंगामात सर्वाधिक टॉस जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

आतापर्यंत या यादीत फक्त कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांची नावे समाविष्ट होती. यामध्ये 2013 मध्ये केकेआर आणि मुंबई इंडियन्स संघाने 12-12 सामन्यांमध्ये टॉस जिंकला होता, तर 2019 च्या आयपीएल हंगामात सीएसके संघाने 12 सामन्यांमध्ये टॉस जिंकला होता. आता या यादीत पंजाब किंग्ज संघाचे नाव देखील सामील झाले आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली उत्तम खेळ दाखवणाऱ्या पंजाब किंग्ज संघाचे लक्ष त्यांच्या पहिल्या आयपीएल ट्रॉफी जेतेपदावर आहे. आयपीएलच्या गेल्या 17 हंगामांमध्ये अंतिम लढतीत टॉस जिंकणारा संघ विजेता ठरला आहे. त्यामुळे पंजाब किंग्ज संघ हे वर्चस्व राखू शकेल की नाही याकडे सर्वांच्या नजरा असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news