एशियन गेम्ससाठी शिखर धवन होणार कर्णधार?

एशियन गेम्ससाठी शिखर धवन होणार कर्णधार?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : एशियन गेम्स 2023 चीनमध्ये 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरदरम्यान खेळली जाणार आहे. या खेळांमध्ये क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे. क्रिकेट स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये आयोजित केली जाते. 'बीसीसीआय' आपले पुरुष आणि महिला दोन्ही संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत पाठवणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाची धुरा शिखर धवनकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.

चीनमध्ये ही स्पर्धा होत असतानाच भारतात एकदिवसीय विश्वचषकही खेळला जाणार आहे. अशा स्थितीत भारताचा दुय्यम संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठवला जाईल. 'बीसीसीआय' शिखर धवनला या संघाचा कर्णधार बनवू शकते. शिखर धवन टीम इंडियातून बाहेर पडला असला, तरी तो आशियाई क्रीडा स्पर्धेत पुनरागमन करू शकतो.

30 जूनपूर्वी 'बीसीसीआय' भारतीय ऑलिम्पिक संघटनेला खेळाडूंची यादी पाठवेल, ज्यांना ते आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी पाठवू शकतात. शिखर धवनने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये त्याने 7 शतके आणि 5 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 2,315 धावा केल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news