Shikhar Dhawan Ex Wife: ५.७२ कोटी रूपये परत द्या.... शिखर धवनच्या एक्स वाईफ आयशा मुखर्जीला कोर्टाचा झटका

Shikhar Dhawan Ex Wife
Shikhar Dhawan Ex Wifepudhari photo
Published on
Updated on

Shikhar Dhawan Ex Wife: भारताचा माजी खेळाडू शिखर धवनने गर्लफ्रेंड सोफी शाईन सोबत थाटामाटात दुसरं लग्न केलं. या लग्नाला टीम इंडियातील रोहित शर्मा, राहुल द्रविड, इरफान पठाण, सुरेश रैना यांनी देखील उपस्थिती लावली होती. दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणाऱ्या शिखर धवनला पहिल्या लग्नाच्या बाबतीत देखील मोठा दिलासा मिळाला आहे.

दिल्ली कौटुंबिक न्यायालयानं धवनची एक्स वाईफ आयशा मुखर्जीला एक्स पती शिखर धवनला ५.७२ कोटी रूपये परत करण्याचे आदेश दिले आहेत. शिखर धवन आणि आयशा यांचा २०२३ मध्ये घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्या दोघांमध्ये कायदेशीर लढाई सुरू झाली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या फॅमिली कोर्टाचा आदेश

आयशा आणि शिखर यांच्यातील कायदेशीर लढाईची सुरूवात ही ऑस्ट्रेलियातील फॅमिली कोर्टानं एक आदेश दिल्यावर सुरू झाला. शिखर धवनची माजी पत्नी आयशा मुखर्जी ही ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. तिनं संपत्तीच्या सेटलमेंटसाठी ऑस्ट्रेलियन कोर्टात धाव घेतली होती.

प्रॉपर्टी सेटलमेंट अंतर्गत पती पत्नीला वैवाहिक संपत्तीची वाटणी करणे गरजेचं असतं. या अंतर्गत शिखर धवनला ५.७२ कोटी रूपये देणं आहे.

दिल्ली कोर्टानं ऑस्ट्रेलियन कोर्टाची ऑर्डर केली चॅलेंज

दिल्ली फॅमिली कोर्टानं भारतात ऑस्ट्रेलियन कोर्टाच्या ऑर्डर वैधतेला आव्हान दिलं होतं. यावेळी न्यायमूर्तींनी ऑस्ट्रेलियाची प्रॉपर्टी सेटलमेंट संकल्पना भारताच्या कायदेशीर चौकटीसाठी अपिरिचीत आहे. भारतीय वैवाहिक कायद्यानुसार विशेषकरून हिंदू मॅरेज अॅक्ट नुसार प्रॉपर्टी सेटलमेंटची संकल्पना नाही. त्यामुळं दिल्ली कोर्टानं ऑस्ट्रेलियन कोर्टाचा आदेश असमर्थनीय असल्याचं सांगत आयशा मुखर्जीला ५.७२ कोटी रूपये शिखर धवनला परत देण्याचे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news