

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा किंग अभिनेता शाहरूख खान आपल्या 'कोलकाता नाइट राइडर्स' या संघामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. आयपीएलच्या काही निवडक लोकप्रिय संघांपैकी 'कोलकत्ता नाईट राइडर्स' हाही एक संघ क्रिकेटप्रेमींचा आवडता संघ बनला आहे. लवकरच 'आयपीएल 2025' चा सीझन सुरू होत असून यादरम्यान आयपीएलचे प्रवर्तक ललित मोदी यांनी शाहरूख खानच्या आयपीएल टीमबाबत एक मोठा खुलासा केला आहे. (IPL AUCTION 2025)
२००८ मध्ये शाहरूख खानने आपली जवळची मैत्रीण अभिनेत्री जुही चावला यांच्यासोबत भागीदारी करत कोलकत्ता (केकेआर) हा संघ ५७० कोटी रुपयांना विकत घेतला होता. त्यानंतर २०१२, २०१४ व २०२४ अशी तीन वेळा इंडियन प्रिमिअर लीग जिंकत कोलकता टीमने क्रिकेटप्रेमींच्या मनात घर केले आहे. (IPL AUCTION 2025)
ललित मोदी यांनी त्याच्या संघाबाबत पॉडकास्टमध्ये खुलासा केला की, तीन वेळा आयपीएल जिंकत आज केकेआर हा संघ लोकप्रिय झाला असला तरी शाहरूख खानची पहिली पसंत कोलकत्ता (केकेआर) नव्हे तर मुंबई इंडियन्स हा संघ होता. मात्र मुकेश अंबानी यांनी त्या संघाची निवड केली. त्यानंतर त्याने बंगळुरू विकत घेण्याचा विचार केला, मात्र तोही संघ विजय मल्ल्याने विकत घेतला. त्यानंतर त्याने केकेआर हा संघ विकत घेतला. (IPL AUCTION 2025)