Shafali Verma world record : पाकिस्तानविरुद्धच्‍या सामन्‍यात शफाली वर्माचे २ वर्ल्ड रेकॉर्ड!

अवघ्या ६ चेंडूंच्या खेळीत मोडित काढले जागतिक विक्रम
Shafali Verma world record
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताची स्फोटक फलंदाज शफाली वर्मा हिने इतिहास रचला आहे. Pudhari
Published on
Updated on

Shafali Verma world record : महिला आशिया चषक २०२६ मध्ये पार पडलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताची स्फोटक फलंदाज शफाली वर्मा हिने इतिहास रचला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तिने तुफानी फलंदाजी करत अनेक जागतिक विक्रम आपल्या नावावर केले.

महिला टी २०तील अनोखा विक्रम नावावर

सामन्यात २२ वर्षीय शफाली क्रिजवर जास्त वेळ टिकू शकली नाही. तिने ६ चेंडूंत १२ धावांची खेळी केली आणि ती फातिमा सनाचा शिकार ठरली. मात्र, डावाच्या पहिल्याच चेंडूवर सादिया इक्बालला दणदणीत षटकार ठोकून तिने आपल्या खेळीची सुरुवात केली. यासह महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एकापेक्षा जास्त वेळा डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारी ती जगातील एकमेव खेळाडू ठरली आहे.

Shafali Verma world record
Pakistan Match Fixing Suspicion: पाकिस्तान क्रिकेटच्‍या मानगुटीवर पुन्हा मॅच फिक्सिंगचे भूत? PCB कडून खेळाडूंचे फोन ताब्यात!

सर्वात कमी वयात ३००० धावा पूर्ण करणारी पहिली फलंदाज

याशिवाय, महिला टी-२० मध्ये सर्वात कमी वयात ३,००० धावा पूर्ण करणारी शफाली पहिली फलंदाज बनली आहे. यापूर्वी हा विक्रम आयर्लंडच्या गॅबी लुईसच्या नावावर होता. तसेच अवघ्या २,१८२ चेंडूंत हा टप्पा गाठून तिने सर्वात जलद ३ हजार धावा करण्याचा पराक्रमही आपल्‍या नावावर केला आहे.

Shafali Verma world record
Cricket Controversy : ‘रोज कपडे बदलावेत तशा योजना बदलतात’; गिलेस्पीने पाकिस्तान क्रिकेटची अब्रू वेशीवर टांगली

पाकिस्तानी संघ भारतीय फिरकीच्‍या जाळ्यात

आपला २०० वा टी-२० सामना खेळणाऱ्या पाकिस्तान संघाला भारतीय गोलंदाजांसमोर चाचपडावे लागले. भारताच्या फिरकीपटूंनी पाकिस्तानला अवघ्या ५५ धावांवर रोखले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पाकिस्तानची ही अत्यंत लाजीरवाणी धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरादाखल भारताने ५६ धावांचे सोपे आव्हान लिलया पार केले. या विजयासह भारताने महिला आशिया चषक २०२६ मधील आपला विजयी रथ कायम राखत अ-गटात (Group A) अव्वल स्थान मजबूत केले आहे.

पराभवानंतरही वहाब रियाझचा मोठा दावा

दुबईत झालेल्या या लाजीरवाण्या पराभवानंतरही पाकिस्तान संघाचे मेंटॉर वहाब रियाझ यांनी आपल्या संघाचा बचाव केला आहे. ते म्हणाले, "आमच्या संघातील सर्व खेळाडू अत्यंत गुणवान आहेत, फक्त त्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आमचा पुढचा सामना हाँगकाँगविरुद्ध आहे. भारताविरुद्ध काय चुका झाल्या यावर आम्ही चर्चा करू. मी अजूनही मानतो की या आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानच ट्रॉफी जिंकणारा सर्वोत्कृष्ट संघ आहे, कारण येथील परिस्थिती आमच्या खेळाला अनुकूल आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news