दुबई : बांगला देशच्या अधिपत्याखाली होणार्या आगामी महिला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचे सामने दुबई आणि शाहजाह येथे खेळवले जाणार आहेत. सहावेळा वर्ल्डकप उंचावणार्या ऑस्ट्रेलियासमोर ‘अ’ गटात 2020 च्या उपविजेत्या भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचे आव्हान असणार आहे. ‘ब’ गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, 2016 चा चॅम्पियन वेस्ट इंडिज, बांगला देश व स्कॉटलंड हे समोरासमोर असतील.
या स्पर्धेतील भारतीय संघाचे वेळापत्रक समोर आले आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ 6 ऑक्टोबर रोजी समोरासमोर येतील. बांगला देशमधील अस्थिर वातावरण लक्षात घेता ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे हलवण्यात आली आहे आणि 3 ते 20 क्टोबरदरम्यान होणार्या या स्पर्धेचे आयोजक बांगला देश क्रिकेट बोर्डच असणार आहे.
श्रीलंका आणि स्कॉटलंड हे ‘आयसीसी’ महिला टी-20 वर्ल्डकप पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत दाखल झाले आहेत. प्रत्येक संघ गटात चार सामने खेळतील आणि अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. 17 व 18 ऑक्टोबरला उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. 20 ऑक्टोबरला फायलन दुबईत होईल आणि उपांत्य फेरी व अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहेत. स्पर्धेत एकूण 23 सामने खेळवले जाणार आहेत. 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत 10 सराव सामने होतील.
सराव सामने
29 सप्टेंबर, रविवार- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई
1 ऑक्टोबर, मंगळवार- भारत वि. द. आफ्रिका, दुबई
साखळी फेरी
4 ऑक्टोबर, शुक्रवार - भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
6 ऑक्टोबर, रविवार - भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
9 ऑक्टोबर, बुधवार - भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई
13 ऑक्टो, रविवार - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजा
बाद फेरी
17 ऑक्टोबर, गुरुवार - उपांत्य फेरी 1, दुबई
18 ऑक्टोबर, शुक्रवार - उपांत्य फेरी 2, शारजाह
20 ऑक्टोबर, रविवार - फायनल, दुबई
भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यास ते सेमीफायनल-1 मध्ये खेळतील.